दिनांक ६ मार्च २०२६ श्रीगोंदा: (प्रतिकात्मक फोटो)
श्रीगोंदा शहरातील खाटीक गल्ली भागात गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करून मांस विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

गुरुवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ३० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ मार्च रोजी पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास ‘डायल ११२’ वर माहिती मिळाली की, खाटीक गल्ली येथील रहिवासी बिलाल कुरेशी हा इतर साथीदारांच्या मदतीने गोवंश जनावराची कत्तल करत आहे.

या माहितीची दखल घेत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली.

पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असता, आरोपी जनावराचे मांस विक्रीच्या उद्देशाने कत्तल करताना दिसून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- अंदाजे १५० किलो वजनाचे गोवंशीय बैलाचे मांस (किंमत ३०,००० रुपये).
- कत्तलीसाठी वापरलेला लोखंडी सत्तूर (किंमत १०० रुपये).
- आरोपींची नावे:
१) बिलाल महमदईसाक कुरेशी (वय ४२ वर्ष)
२) मुशाईद महमद कुरेशी (वय २० वर्ष)
३) उजेश वाहोद चौधरी (वय २१ वर्ष)
(सर्व राहणार खाटीक गल्ली, श्रीगोंदा) - या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गहिणीनाथ यादव यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २७१, ३(५) आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) चे कलम ५(क), ९(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- महाराष्ट्र राज्यात गोवंश कत्तलीस बंदी असतानाही अशा प्रकारे कृत्य करून आरोग्यास घातक ठरेल असा संसर्ग पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.
पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

