श्रीगोंद्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शिवाजीनगर परिसरातील घटना.

दिनांक ३ मार्च २०२६ श्रीगोंदा:

शहरातील शिवाजीनगर परिसरात एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, ३ मार्च रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर सखाराम निंबाळकर (वय २५, रा. रेल्वे स्टेशन परिसर, श्रीगोंदा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सागरने शिवाजीनगर भागातील निशिगंधा पांडुरंग घोडके यांच्या खोलीत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गळफास घेतला.

घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र, सागरने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

याप्रकरणी किरण तुकाराम निंबाळकर (वय ३४, रा. रेल्वे स्टेशन, श्रीगोंदा) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची (AD) नोंद केली आहे.

https://amzn.to/3OUHY4k

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

स्रोत:(AD)..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading