दिनांक २ मार्च २०२६, श्रीगोंदा:
बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोळगाव शिवारातील सिक्रेट हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोरील बाजूस मोकळ्या मैदानात
फिर्यादी अविनाश दिनकर शिंदे राहणार कडाचीवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे व त्याचा मित्र नरेंद्र ठाकूर यांना पाच लाख रुपयात अडीचशे ग्रॅम स्वस्तात सोने घेऊन देतो

असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना बोलावून सदर ठिकाणी अनोळखी महिला व दहा ते बारा जणांनी त्यांना लाथा बुक्क्याने मारहाण करून
त्यांच्याकडील रोख रक्कम पाच लाख दोन मोबाईल त्यामध्ये आयफोन व विवो कंपनीचा व नरेंद्र ठाकूर यांच्याकडील बॅग त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन एटीएम कार्ड असे बळजबरीने चोरून घेऊन पळून गेले आहेत. वगैरे मजकूर वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर झाले प्रकार बाबत माहिती मिळताच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या योग्य सूचना व मार्गदर्शनाखाली तत्काळ सदर ठिकाणी बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व पोलीस स्टाफ असे तात्काळ रावांना झाले.

सदर ठिकाणच्या परिस्थितीवरून व मिळालेले माहितीनुसार यातील आरोपी यांचा शोध घेत असताना कोळाई मंदिराच्या जवळ दोन इसम यांना पाठलाग करून पकडले.
पकडण्यात आलेले इसमांकडे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव निजाम जलद्या काळे राहणार पारगाव तालुका श्रीगोंदा व सुयोग बाजऱ्या काळे राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले.
त्यांची अंगझडती घेतल्या असता त्यांच्याकडे काही रक्कम मिळून आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे.

त्यांची दिनांक ५ मार्च २०२६ रोजी पर्यंत माननीय न्यायालय कडून पाच दिवसाची पोलीस कस्टडी घेण्यात आले आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नंदकुमार सोनवलकर हे करत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे सो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री प्रवीणचंद लोखंडे,

पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. किरण कुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवलदार भाऊसाहेब यमगर,
पोलीस हवालदार धर्मराज दहिफळे, पोलीस नाईक शरद गांगर्डे, यश ठोंबरे, पोलीस हवालदार भाऊसाहेब शिंदे, पोलीस शिपाई दादासाहेब शिरसागर, विनोद पवार, मच्छिंद्र बर्डे, विठ्ठल खारमाळे, कैलास शिपणकर, राजू भोर, चालक विकास सोनवणे, यांनी केले आहे.
स्रोत:(ऑनलाइन वृत्त)
