दिनांक २८ जुलै २०२५,अहिल्यानगर:
गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी असतानाही त्याची बेकायदेशीररीत्या साठवणूक करून विक्रीसाठी तयारी करणाऱ्या इसमावर कोतवाली पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. यामध्ये सुमारे ३ लाख ९९ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. २७ जुलै २०२५ रोजी मार्केटयार्ड ते आनंदऋषीजी हॉस्पीटल रोडवरील पॉलीटेक्नीक कॉलेजसमोर करण्यात आली.

ही माहिती कोतवाली पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती. त्यानुसार तातडीने पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान शरद अर्जुन पवार (वय ३० वर्षे, रा. जाम कौडगाव, ता. व जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व गुटखा आढळून आला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल (पोकॉ) सोमनाथ केकान यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे या करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) श्री. अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, म.पो.स.ई. शितल मुगडे, पो.स.ई. गणेश देशमुख, गुन्हे शोध पथकाचे पोसई कृष्णकुमार सेदवाड, पोहेकॉ. बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, सूर्यकांत डाके, योगेश कवाष्टे, राहुल शिंदे, अभय कदम, सत्यजित शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, संदीप कव्हळे, प्रतिभा नागरे, हिना बागवान (दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु) या अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
