श्रीगोंदा नगरपालिकेवर टीकेची तोफ.! पिसाळलेल्या कुत्र्याचा चौघांना चावा; दोघे गंभीर..

दिनांक २० ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:

दिवाळीच्या खरेदीच्या लगबगीत रविवारी श्रीगोंदा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने चार नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली.

या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. नवनाथ सुदाम मोहिते (पेडगाव), युवराज राजू बिबे (नवनाथ नगर) आणि आदिवासी समाजातील वडील-मुलगा असे चार जण जखमी झाले आहेत.

जखमींवर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, नगर येथे हलवण्यात आले.

Oplus_131072

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, श्रीगोंदा नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मोकाट कुत्रे व जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपरिषदेने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी भगत मॅडम यांची भेट घेऊन केलेल्या कारवाईबाबत जाब विचारणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनही देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

स्रोत:(निवेदन)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading