दिनांक, २८ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा/पुणे:
स्वारगेट एसटी बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये २५ फेब्रुवारीला तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्तात्रेय गाडे (वय ३१, रा. गुनाट, ता. शिरूर)चा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम राबवली.
स्वारगेट पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दीड तासांत आरोपीची ओळख पटवली. मात्र, तो गावात न सापडल्याने पोलिसांनी तीन दिवस तिथे तळ ठोकला.
पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पाचशेहून अधिक पोलिस कर्मचारी, गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि मुख्यालयाच्या संयुक्त पथकांनी आरोपीला शोधण्यासाठी उसाच्या शेतात आणि सार्वजनिक ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. श्वान पथक व थर्मल ड्रोनचाही वापर करण्यात आला.
पोलिसांनी गाडेचा मागील वर्षभरातील रेकॉर्ड तपासला असता, तो पंढरपूर, उज्जैन, शिर्डी, शनि शिंगणापूर, स्वारगेट बसस्थानक, श्रीगोंदा आणि दौंड रेल्वे स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वारंवार गेल्याचे आढळले.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)





