तांदळी गावातील अनधिकृत दारू विक्रीवर कारवाईची मागणी.. पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे येथील अवैध धंद्यांचे फावले..

दिनांक २० जुलै २०२४, श्रीगोंदा:

तांदळी गावातील ग्रामसभेत अनेकदा अनधिकृत दारू विक्रीवर कारवाईसाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांच्या मदतीने दारू विक्री जोरात सुरु असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात तांदळी गावचे सरपंच निगडे यांच्याशी वार्तालाप केला असता, त्यांनी तांदळी गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याचे मान्य केले. यातून होणारे वाद नवीन नाहीत आणि यासंबंधीचे पर्यवेक्षण आर्थिक तरतुदीत होत असून पोलीस प्रशासनही यात हातभार लावत असल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यातील तांदळी गावात राजरसपणे हातभट्टी दारू विक्री होत आहे. दोन दिवसांपूर्वी याच धंद्याच्या अनुषंगाने झालेल्या वादातून ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्याची धमकी देऊन आर्थिक तडजोड केल्याचे समोर आले आहे. दोन दारू विक्री करणाऱ्या इसमांमध्ये झालेल्या वादानंतर पोलीस स्टेशनला आलेल्या मागासवर्गीय इसमाने वेगवेगळ्या आणि गंभीर आरोप करत समोरच्याला जेरबंद करण्याच्या उद्देशाने ॲट्रॉसिटीच्या कायद्याचा वापर करण्याची धमकी देऊन समोरच्याकडून २५ हजार रुपये घेतल्याचे अधिकृत माहिती पुढे आली आहे.

या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करण्यात पोलीस हातबल असल्याचे जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. पोलिसांनी तात्काळ या अनधिकृत विक्रीवर कारवाई करावी, अन्यथा ग्रामसभे मार्फत सदरील हातभट्टी विक्री बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. तसेच पोलिसांना या धंदेवाल्यांकडून हप्ते मिळत असल्याने कारवाई करण्यात ते उदासीन असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading