दिनांक ४ जुलै,श्रीगोंदा:
बेकायदेशीर रित्या कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा व शेतकरी निवास भाड्याने देणे, लाखो रुपये अनाधिकारशाहीने वापरणे, मनमानी कारभार करत कार्यक्षेत्रातील गाळे परस्पर विकणे, काष्टीतील बाजारात चुकीच्या जागा दाखवत त्या ठिकाणी गाळे बांधण्यास परवानगी देणे,असे अनेक गैरकारभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी केले असल्याचे लेखी निवेदन उमेश निवृत्ती पोटे या संचालकाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांना दिले आहे.निवेदनामध्ये सर्व गैरप्रकाराची चौकशी करीत, दिलीप डेबरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, सचिव दिलीप डेबरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हुकूमशाही व एकाधिकार पद्धतीने कामकाज करत असल्याचा आरोप उमेश पोटे यांनी जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. त्यात उल्लेख केल्याप्रमाने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक मीटिंग मध्ये प्रथम सह्या घेऊन उपस्थिती दाखवली जात असून, मीटिंगमध्ये जे विषय होतात,त्या व्यतिरिक्त प्रोसिडिंग नंतर लिहिले जात आहे, बेकायदेशीर विषयांना विरोध केला असता,ते प्रोसिडिंग लिहले जात नाही, प्रोसिडिंग मध्ये सर्व विषयाला मंजुरी दाखवली जाते, संचालकांचे म्हणणे नं ऐकता कारभार करतात,याविषयी विचारले असता प्रोसिडिंगला सुप्रीम कोर्टात पण चॅलेंज होत नाही असे सांगतात, त्यांच्या मनाप्रमाणे बेकायदेशीर विषयही दडपशाहीने लिहले जातात,संचालकांना सभेचे प्रोसिडिंग नक्कल दिली जात नाही, कामगारांचे पीएफ मधून रकमा काढून घेतल्या जातात, उपसमितींच्या सभा घेतल्या जात नाहीत, सदरील सचिव सभेमध्ये ठराव कायदेशीर किंवा बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत नाहीत,सर्व जबाबदारी संचालक मंडळावर ढकलून मोकळे होतात.असे विविध मुद्दे यात नमूद करण्यात आले आहेत.
याप्रकरणाची सखोल चौकशी करून योग्यती कारवाई न झाल्यास उपोषणाला बसनार असल्याचे पोटेनीं निवेदनात स्पष्ट केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी स्वतः च्या पगारवाढीचा विषय बैठकीत न मांडता तसेच संचालकांना विचारात न घेता बेकायदेशीर पगार वाढवून घेतला असल्याने, डेबरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बाजार समिती सभापती धनसिंग भोईटे यांनी केल्याचे समजते आहे.
(स्रोत:जिल्हा उप निबंधकांना पोटे यांनी दिलेले निवेदन व मिळालेल्या माहितीनुसार)
