उप सभापती वैभव पाचपुते यांचा जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा..?

दिनांक २८ जुलै,श्रीगोंदा:

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा बाजार समितीचे उपसभापती श्री. वैभव पाचपुते यांच्यावर अविश्वास दाखल झाला होता. त्यासंदर्भात दिनांक २९ जुलै २० रोजी श्री. भोसले (प्रांताधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती. तत्पूर्वी आज दिनांक २८ जुलै २० रोजी जिल्हाउपनिंबधक अहमदनगर यांचेकडे अचानकपणे राजीनामा दिला असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. त्यामुळे अविश्वास साठीची मीटिंग होईल का नाही ? याबाबत तर्कवितर्कला उधाण आले आहे.

जर असे झाले असेल तर, या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. त्याचप्रमाणे नवीन सभापती व उपसभापती यांच्या निवडीच्या तारखा आणि या निवडीबाबत सर्वांचे लक्ष वेधून घेतले जाणार आहे. बाजार समिती ही शेतकरी बंधूंना केंद्रस्थानी मानून काम करते. शेतीमालाला योग्य दर मिळाला पाहिजे. तसेच, बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक घटकाला आपली बाजार समिती आहे. या आत्मविश्वास आणि निर्धाराने सर्व संचालक मंडळ निश्चित काम करेल, अशी प्रतिक्रिया अनेक जाणकारांकडून पुढे येत आहे.

स्रोत:(मिळालेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading