सामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे सतीश शेठ पोखरणा काळाच्या पडद्याआड..

दिनांक ३० डिसेंबर, श्रीगोंदा:

व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष व श्रीगोंदा तालुक्यात व्यापारी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे, सतीश शेठ पोखरणा यांचे आज दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी ९:३० च्या दरम्यान रुबी हॉल पुणे येथे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सामान्यांच्या अडचणीत धावून येणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. आमदार व माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता. राजकीय विचार मंचावर विचार व्यक्त करताना लोकांवर वेगळीच छाप त्यांच्या भाषणातून पडत, त्यांच्या सर्वश्रूत स्वभावामुळे ते लोकांना सहज मैत्री भावाने जवळ करीत असत, व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून तसेच शांतता कमिटीच्या सदस्य नात्याने श्रीगोंदा तालुक्यातील वेगवेगळ्या सामाजिक विषयांतुन संभाव्य व उपस्थित होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत त्यांचा निर्णय प्रशासकीय बैठकांमध्ये नोंदवला जात असे.

पोखरणा यानां मागील काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुबी हॉल पुणे येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी साडेनऊ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोरोना संदर्भातही त्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या होत्या. परंतु, दवाखान्यात दाखल केल्यापासूनच त्यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह होत्या.

सतीश शेठ पोखरणा यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी त्यांचे मुळगाव तांदळी-टाकळी येथे आज पाच वाजता ठेवण्यात येणार असून, संध्याकाळी सात वाजता अमरधाम, श्रीगोंदा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते आहे.

स्त्रोत:(काका कदम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading