प्रजापिता सम्राट अशोक (भाग ११).

अशोकाचे भव्य स्वागत

तक्षशिला ही बौद्धकाळात फारच भरभराटीस आलेली नगरी म्हणून प्रसिद्ध होती . व्यापार आणि विद्येचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होती . त्यानंतर पार्शीयन राजाने दोनशे वर्षे राज्य केले . आता अशोक याच भूमीत दाखल झाला होता . येथील लोक खरोखरच राज्यद्रोही आहेत का ? त्यांनी बंड करण्याची कारणे नेमकी कोणती ? या प्रश्नांनी अशोकाच्या डोक्यात गर्दी केली होती .

https://bit.ly/bspmycityshrigonda

तो तक्षशिलानगरीच्या जवळ आला . खरंतर अशोकाच्या कार्याची ख्याती या अगोदरच लांब लांबपर्यंत पसरली होती.अशोकाचे आगमन तक्षशिला नगरीत होत आहे असे कळताच संपूर्ण नगरी खडबडून उठली आणि कामाला लागली . जागोजागी पानाफुलांच्या कमानी लावल्या होत्या . फुलांचे सडे घातले होते . अनेक तरुण – तरुणी हातात फुले घेऊन अशोकाच्या स्वागतासाठी सज्ज होते .

सा – या नगरीलाच उत्साहाचे उधाण आले होते . सुसीमच्या विरूद्ध बंड करणारी अशोकावर फुलांचा वर्षाव करण्यास तयार होती . नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ एक घोडेस्वार हातात पांढरे निशाण घेऊन पुढे आला . अशोकाचे सैन्य हातातील शस्त्र सरसावून पुढे येणार इतक्यात अशोकाने इशारा केला . तेव्हा ते जागेवरच थांबले . पाठीमागून धुळीचे लोट हवेत दिसू लागले . बघता बघता सारी नगरी अशोकाचे स्वागत करीत होती . अशोकाच्या पुढे प्रश्न पडला ; सुसीमदादाने सांगितल्यापेक्षा येथे तर सगळं वेगळंच होतं .

सैन्यही आश्चर्यचकीत झालं . अशोकाच्या नावात एवढी ताकद , इतकं अलोकिक प्रेम पाहून सगळ्यांना आनंद झाला . बंडाऐवजी येथे शांतता पाळणारे लोक आहेत ही अशोकाची खात्री झाली … लोकांनी घोषणा दिल्या – ” मगध साम्राज्याचा विजय असो . ” ” उपराज्यपाल अशोककुमार यांचा विजय असो . ” ” सम्राट बिंदूसार महाराजांचा विजय असो . ” अशा घोषणांनी नगरी दणाणून गेली . लोकांनी अशोकाची मिरवणूक काढली . जागोजागी अशोकाच्या अंगावर पुष्पवृष्टी करण्यात आली . या स्वागताने अशोकासह सर्व सैनिक अधिकारी आश्चर्यचकीत झाले .

सेनापती विजयसेन मंत्री वीरवर्मा यांना तर जोराचा धक्काच बसला : त्यातच वृद्ध म्हातारा पुढे आला . तो म्हणाला , ” आता तरी मला न्याय द्या . तुमच्या भावाने आम्हाला हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा दिली होती . ” एका शेतक – याने त्या वृद्धाला बाजूला केले . तो महाराजांना म्हणाला , “ यांची कन्या विनाकारण मारली गेली . तेव्हापासून हा माणूस असा वागतो . राग मानू नये . महाराज , आमचा मगध राज्यावर अगर राजावर अजिबात राग नाही . आम्ही आमच्या राज्याशी आजही प्रामाणिक आणि एकनिष्ठ आहोत . परंतु .. ” ” परंतु काय ? बोला .

” ” येथे नेमलेले दुष्ट अधिकारी आम्हाला भयानक त्रास देतात . ” एवढ्यात कोणीतरी त्याच्या पाठीवर चाबकाचा फटकारा मारला . तसा तो जोरात कळवळून ओरडला . आई ग मेलो . वाचवा . त्या वृद्धाला फरकटत नेले .. अशोक अस्वस्थ झाला . चाबूक मारणा – या माणसाकडे इशारा करीत त्याने विचारले ,” हा कोण ? ” “ हाच तो प्रांतपती मेघवर्मा . ” बंधू पालीत म्हणाला . ” महाराज , क्षमा असावी . या वृद्धाने आपणास त्रास दिला . येण्यास थोडा 56 99 वेळ लागला . मेघवर्माने आणलेल्या रथात बसणे तर लांबच पण त्याकडे पाहिलेदेखील नाही .

https://bit.ly/bspmycityshrigonda

मेघवर्माच्या डोळ्यात काळजीचे ढग दाटून आले . तो मनातून दचकला . तक्षशिलच्या लोकांना न्याय मिळणार याची खात्री वाटली . लोक मनमोकळेपणाने बोलत होते . ‘ उपराज्यपाल अशोककुमार यांचा विजय असो . ” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले . मेघवर्माचे मात्र धाबे दणाणले . त्याला घाम फुटला.


क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading