प्रजापिता सम्राट अशोक (भाग १२).

सहदेव बंदिवानची भेट

ज्यांनी विद्रोह केला त्यांचा म्होरक्या सहदेव याला बंदिवान करून बंदिखान्यात डांबण्यात आले होते. अनेकाच्या करुण कहाण्या अशोकाच्या कानावर आल्या होत्या. लोकांनी केलेल्या स्वागताबद्दल, दिलेल्या सहकार्याबद्दल अशोकाने समाधान व्यक्त करून त्यांना योग्य न्याय मिळेल असा विश्वास दिला. लोकांच्या करुण कहाण्या ऐकून अशोक लोकांना म्हणाला, ” आता राज्याची सर्व सूत्रं मी माझ्या हातात घेतलेली आहेत .

https://bit.ly/bspmycityshrigonda

नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काम करण्यासाठी व मला काही गोष्टी समजून घेण्यासाठी एक सभा बोलावली जाईल . आता जे नागरिक बंदिखान्यात आहेत त्यांना भेटण्यासाठी मी स्वतः जात आहे. ” हे ऐकून अधिकारीवर्गाच्या तोंडचे पाणीच पळाले . त्याच्या कुकर्माचं बिंग आता उघड होणार होतं. त्यामुळे प्रांत अधिकारी अशोकाला त्यापासून रोखण्यासाठी म्हणाला, “ महाराज , या गोष्टींचा आपणास कमी अनुभव आहे . तेव्हा बंदिशाळेत जाणे योग्य नाही. त्यासाठी आम्ही आहोत . ” “ योग्य की अयोग्य ते नंतर पाहू. परंतु आता माझी आज्ञा आहे तसे झाले पाहिजे . कोणाचाही उद्दामपणा माझ्यापुढे चालणार नाही .

‘ प्रताधिकारी व इतर मंत्री यांची पाचावर धारण बसली . अशोक म्हणजे सुसीम नव्हे याची प्रचीती पहिल्या झटक्यात आली. तरी ते आपली चाल सोडायला तयार नव्हते. अशोकानं बंदिखान्याच्या अंधा – या तळघरात प्रवेश केला. फक्त हाडाचा सापळा पोट पाटीला चिकटलेले डोळे खोल गेलेले. सहदेवने किलकिल्या डोळ्यांनी पाहिले आणि मान खाली झुकवली. स्वतः अशोक म्हणाला, “ मी सम्राट बिंदूसारांचा मुलगा अशोक. मला तुम्हाला भेटून काही गोष्टींवर सामोपचाराने चर्चा करावी वाटली म्हणून मी आलो आहे .

“कोठे तुरूंगात डांबण्याचा आदेश देणारा सुसीम अन् कोठे बंदिवान माणसांची कदर करून त्यांना भेटणारा अशोक ! हे दोन धृवच नाही का ? ” सहदेवच्या मनात विचार चमकून गेला . त्याच्या भावनांचा कल्लोळ झाला . सुकल्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ” ” बोलणं चालू असतानाच एक आवाज आला. “ येथे साधे उपचार करू दिले जात नाही तर सामोपचार कोठला ? आणि कोण देणार ? ” ” ही कोण ? ” बंधू पालीतने सांगितले, “ हीच ती उज्ज्वला, सहदेवची कन्या.

” येथे साधे पाणीदेखील मिळणे कठीण आहे मग औषध – उपचार तर लांबच. ” अशोकला ती निळ्या आकाशात काळ्या ढगामधून सळसळणारी वीजच वाटली . एवढ्यात त्याच चपळाईने ती पाय – या उतरून खाली आली . निळ्या डोळ्यांची, लांब सोनेरी केसांची, गौर वर्णाची. याही स्थितीत ती फारच सुंदर दिसत होती. पुढे येत म्हणाली, “ महाराज, माझ्या बाबांना औषध देण्याची परवानगी द्या. ” एवढ्यात नाही. ” ” बरोबर आहे. आपण सत्ताधीश कुमार सर्व सारखेच. आपण सुसीमचे भाऊ – माणुसकी नसलेले. काळ्या पाषाणी हृदयाचे. आपणास पाझर तो काय फुटणार ? त्यासाठी माणसांच हृदय असावं लागतं .

येथे काय न्याय आहे ? अपराध असला काय आणि नसलं काय , धर की टाक बंदिखान्यात . येथे आम्हाला कोणी वाली नाही . मी बोलले हा अपराध नाही का ? मग वेळ कशाला, चढवा माझ्या हातात बेड्या अन् टाका बंदिखान्यात खितपत. ” आतापर्यंत अशोकाच्या नुसत्या आवाजाने एकेकाला घाम फुटायचा . कोणाची बोलायची हिंमत होत नसे. पण ही सळसळणारी वीज अशोकाच्या नजरेला नजर देऊन न डगमगता बोलत होती .

अशोकालाही तिच्या स्पष्ट बोलण्याचं कौतुक वाटलं . पण चेह – यावर अथवा बोलण्यातून ते कोठेही व्यक्त होऊ दिले नाही. सहदेवच्या हातापायांच्या काड्या झाल्या होत्या. त्याला लोखंडी साखळदंडांनी जखडलं होतं. जागोजागी जखमा झाल्या होत्या. धड त्याला उभंही राहता येत नव्हतं. सारखी खोकल्याची उबळ येत होती. छातीचा पिंजरा जोरजोराने खालीवर होत होता. त्याला एक शब्दही धंड नीट बोलता येत नव्हता. अशोकांनी सहदेवच्या जवळ जाऊन स्वतःच्या हाताने पाणी पाजले आणि त्याच्या हातापायातील’ वेड्या काढण्याची आज्ञा दिली.

हा प्रकार पाहून रागाने लाल झालेली शब्दातून अंगार ओकणारी उज्ज्वला एकदम शांत झाली. क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तिला पटले की काळ्या पाषाणात नितळ व स्वच्छ पाण्याचा पाझर आहे. अशोकाचं हृदय हे प्रेमळ, दयाळू, सत्यशील माणसाचं आहे. तिच्या डोळ्यांतून अश्रूधारांचा वर्षाव सुरू झाला. प्रयत्न करूनही तो थांबला नव्हता. ” महाराज, मी आपला अवमान केला. आपणास नको नको ते टाकून बोलले. चूक झाली माझी. क्षमा मागते. क्षमा असावी. ” अशोक केव्हा तिच्या नेत्रकैदेत बंद झाला कोणालाही कळले नाही आणि ती अशोकाच्या हृदयातही बसली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

येथे दोघांची मन एकमेकात गुंतली अशोक हा जनतेच्या झालेल्या जखमावर हळूवार कुंकर घालत होता . दयाळू व प्रेमळ अशोक सर्वांनाच प्रिय होत गेला.

क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading