दिनांक ९ मार्च(श्रीगोंदा):
श्रीगोंदा नगरपरिषद संचलित शहर वाचनालयाला हिंदु हृदय सम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा शहर वाचनालय श्रीगोंदा असे नाव द्यावे, अशी मागणी श्रीगोंदा तालुका शिवसेना व युवासेना यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन श्रीगोंदा नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी मंगेश देवरे, (नगराध्यक्ष) सौ. शुभांगीताई मनोहरदादा पोटे, (उपनगराध्यक्ष) रमेश लाढाणे व सर्व नगरसेवकांना शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन सादर केले.

येत्या ३० दिवसांच्या आत सर्वसाधारण सभेमध्ये याबाबत निर्णय घेऊन फलक लावण्याबाबत कारवाई करण्यात यावी. अन्यथा, शिवसेना श्रीगोंदा पदाधिकाऱ्यां सह स्वतः फलक लावेल. असा इशारा यावेळी शिवसैनिक, युवासैनिकांनी निवेदनातून दिला आहे.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख संतोष खेतमाळीस, युवा सेना तालुकाप्रमुख हरिभाऊ काळे, शिवसेना मा. शहर प्रमुख सुरेश देशमुख, युवासेना शहर प्रमुख ओंकार शिंदे, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष शिंदे, तालुका संघटक नाथा पवार, किरण बनसोडे, जावेद फकीर, योगेश भुतकर, अनिरुद्ध पावशे आदी उपस्थित होते.
स्रोत:(निवेदन)
