उर्दू (सेमी इंग्लिश) शाळेत आदर्श माता पुरस्कार देऊन, “जागतिक महिला दिन” साजरा..

दिनांक ९ मार्च(श्रीगोंदा):

श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू (सेमी इंग्लिश) शाळेत आदर्श माता पुरस्कार देऊन महिला दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोटे संदीप यांनी महिला दिन का साजारा केला जातो ? आणि महिलांचे शैक्षणिक कार्यातील योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, शिक्षक संघ महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. मनिषाताई कोथिंबीरे यांनी जमलेल्या महिला पालकांना शुभेच्छा देऊन, भारतातील कर्तुत्ववान महिलांचे माहिती देणारे पुस्तक वाटप केले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या कार्यक्रमांचे अध्यक्ष सौ. राशीदाबी शेख या होत्या. तसेच, या कार्यक्रमांस महिला पालक व शाळा सुधार समितीचे कार्याध्यक्ष श्री. हाजी रऊफभाई शेख, (माजी उपनगराध्यक्ष) अख्तर शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शमीम कादरी, श्री. मोमीन सर, श्री. तिखे सर, श्री. यासीन शेख सर हजर होते. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका सौ. साचे समीना यांनी मानले.

स्रोत:(जागतिक महिला दिन कार्यक्रम,जि. प.प्रा.उर्दू शाळा,श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading