#श्रीगोंदा..कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन १२ मार्च पर्यंत वाढवून मिळावे… घनश्याम (आण्णा) शेलार यांची जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे मागणी..

दिनांक ८ मार्च(श्रीगोंदा):

श्रीगोंदा तालुक्यातील शेतीचा पाणीप्रश्न गंभीर होत चालला असून, वातावरणात वाढत चाललेले तापमान आणि प्रशासनाकडून पाणी सोडण्यात होणारी काटकसर या सर्व बाबींचा विचार करता, घनश्याम आण्णा शेलार यांनी थेट जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याअभावी जळणारी पिकं वाचावित व तालुका कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा. या उद्देशाने अतिरिक्त दोन दिवस तालुक्याला शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी आज दिनांक ८ मार्च रोजी निवेदन सादर केले.

त्यांनी निवेदनात म्हटले की, श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात सध्या कुकडी डाव्या कालव्याचे आर्वतन सुरू आहे. तालुक्यात १० मार्च पर्यंतच पाणी राहणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, श्रीगोंद्यातील अनेक गावांत शेतकाऱ्यांच्या शेतापर्यंत अद्याप पाणी पोहचलेले नाही. उद्या आणि परवा तालुक्यातील सर्व कार्यक्षेत्रात शेतीला व उभ्या पिकाला पाणी पोहचू शकणार नाही. उन्हाची तीव्रता वाढलेली असून, जर, पीकांना पाणी मिळाले नाही. तर, ही पिके जळून जातील. यातील फळबागा जळाल्या तर, तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. बाबत राष्ट्रवादीचे घनश्याम (आण्णा) शेलार यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेऊन, आवर्तन अतिरिक्त दोन दिवस वाढवण्याचे निवेदन सादर केले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

घनश्याम (आण्णा) शेलार यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी व सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी तालुक्यातील आवर्तनाचा कालखंड दोन दिवस दिनांक १२ मार्च २०२१ पर्यंत वाढवून दिल्यास तालुका कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल व त्यांची पिके वाचतील. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील. असे आश्वासन जयंतराव पाटील यांनी शेलार यांना दिले आहे.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading