शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निदर्शने..

दिनांक २१ सप्टेंबर,श्रीगोंदा:

श्रीगोंदा युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारमार्फत आणण्यात आलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा येथे निदर्शने करण्यात आली.

या हुकूमशाही, शेतकरी विरोधी मोदी सरकारच्या विरोधातील या लढाईत बाजार समितीत आलेले शेतकरी सुद्धा उस्फुर्तपणे सहभागी झाले.

यावेळी (महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव) प्रशांत ओगले तसेच (श्रीगोंदा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष) योगेश मेहेत्रे, संदीप वागस्कर, लाला बारगुजे, पवन मोहिते, प्रशांत सिदनकर, संदीप पवार, राहुल पवार, स्वप्नील लिंबोरे, प्रेमराज मोहिते, संकेत बनसोडे, शशिकांत जाधव आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(योगेश मेहेत्रे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading