दिनांक २१ सप्टेंबर,श्रीगोंदा:
अखिल भारतीय प्रजापती कुंभार संघाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या कोषाध्यक्ष पदी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील युवा पत्रकार योगेश पोपटराव चंदन यांची नुकतीच नियुक्ती झाल्याचे पत्र गंगाधर जोर्वेकर प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
अखिल भारतीय प्रजापती कुंभार संघाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या कार्यकारिनीची महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर जोर्वेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाईन बैठकीत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील युवा पत्रकार योगेश पोपटराव चंदन यांची संघटनेच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीवर कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करत नियुक्ती पत्र प्रदान केले.
या प्रसंगी बोलताना चंदन यांनी कुंभार समाज बांधवांच्या प्रशासकीय पातळीवरील अडी अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा महासचिव राजेंद्र बोरुडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, उपाध्यक्ष तुकाराम जोर्वेकर, सचिव रामचंद्र खंडागळे, महिला आघाडीच्या शुभांगी कुंभार यांच्या सह सर्व संघटक उपस्थित होते.
स्रोत:(योगेश चंदन यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
