श्रीगोंदा.. टाकळी कडेवळी गावात दुर्दैवी घटना: तिघांचा मृत्यू, काही जण गंभीर जखमी..!

दिनांक १५ जुन २०२४,श्रीगोंदा,:

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी ४:३० वाजण्याच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळी गावात दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाला असून, काही जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमधील १ जण बारडगाव येथील असून, दोघे जण टाकळी गावातील रहिवाशी आहेत.

याविषयी प्रशासन व स्थानिक लोकांकडून समजलेली माहिती अशी की, टाकळी कडेवळी गावात विहिरीच्या चालु कामात जिलिटिनच्या कांड्या लावण्यात आल्या असताना विहिरीत चार कामगार दुर्दैवाने विहिरीच्या बाहेर येण्याच्या आतच या जिलिटिन कांड्यांचा स्फोट झाला. स्फोटामुळे विहिरीत असलेले चार कामगार विहिरी बाहेर फेकले गेले. यात तिन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, काही लोकं गंभीर जखमी झालेत. मृतकांचे शव विच्छेदन आणि जखमींवर ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे उपचार सुरु करण्यात येत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे टाकळी गावावर शोककळा पसरली आहे.

शहरात आणि तालुक्यात अशी घटना घडण्याची शक्यता यापूर्वीच माध्यमांनी वर्तवली होती. परंतू, प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. कारण मोटर सायकलच्या डिकीत आणि प्रवाशी गाड्यांमधून जिलेटीन काड्यांची अनधिकृत वाहतूक करण्यात येत होती. लोकंवस्तीत या गाड्या लावण्यात येतं होत्या आणि यातून दुर्घटना होऊ शकते.. बाबत काही पत्रकारांनी वार्तांकन केलते. मात्र, त्या विषयी स्थानिक प्रशासन उदासीन राहिले आणि आज संभाव्य दुर्घटना घडली असल्याचे समोरं आले आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहिती नुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading