श्रीगोंद्यात अवधूत राऊत यांच्यावर प्राणघातक हल्ला.! कालकथीत नेत्याच्या तथाकथीत बेट्यावर संशय.? तोंड बांधलेल्या टोळक्याने चढवला राऊतांवर हल्ला.

दिनांक १५ जून २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील आपल्या वैचारिक लेखणीने परिचित असलेले अवधूत राऊत यांच्यावर आज संध्याकाळी मांडवगण रोडवर प्राणघातक हल्ला झाला असून, अज्ञात तोंड बांधलेल्या तीन-चार इसमांनी लाकडी दांडके आणि इतर शस्त्रांनी हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्लेखोरांनी अवधूत राऊत यांना मारहाण करताना एका कालकथीत नेत्याच्या तथाकथीत बेट्याचे नाव घेत धमकी दिल्याचेही राऊत सांगत आहेत. मागील काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे समोर येत होते.

तर तो नेत्याचा बेटा कोण? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली असून, राऊत जर फिर्यादीमध्ये नमूद इसमाचे नाव दाखल करतात, तर आपसूकच तो हल्लेखोरांचा सूत्रधार जगासमोर येईल.

पीडित अवधूत राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “विचारांना विचाराने उत्तर देण्यास असमर्थ असलेली लोकं शस्त्र हातात घेऊन उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, शरीर मोडून तोडून विचार मोडता किंवा विकृत करता येत नाहीत,” असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस पिडीताच्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल. तत्पूर्वी गंभीर दुखापत असल्याने अवधूत राऊत यांना शासकीय वाहनाने जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.

लवकरच त्या नेत्याच्या बेट्याचा उल्लेख श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील FIR मध्ये होईल..? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

स्रोत: (मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading