दिनांक १३ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा..:
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपने १९ पैकी तब्बल ११ जागा जिंकून संख्यात्मक वर्चस्व मिळवले होते. मात्र, नगराध्यक्षपदी काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी मनोहर पोटे यांनी भाजपच्या सुनीता शिंदे यांचा २,१०० मतांनी पराभव करत प्रतिष्ठेची बाजी मारली होती.

त्या वेळी झालेल्या निवडणुकीत २३,६०४ पैकी १९,८५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून तब्बल ८४% मतदानाची नोंद झाली होती. निकाल जाहीर होताच भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक असूनही नगराध्यक्षपद आघाडीने जिंकल्याने स्थानिक राजकारणात नवा पेच निर्माण झाला होता.

📊 २०१९ चा निकाल ..
- एकूण जागा: १९
- भाजप: ११
- काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडी: ८
- नगराध्यक्ष विजयी: शुभांगी मनोहर पोटे (आघाडी)
- नगराध्यक्ष पराभूत: सुनीता शिंदे (भाजप) — २,१०० मतांनी

🏆 नगरसेवक प्रभागानुसार विजयी उमेदवार
प्रभाग विजयी उमेदवार / पक्ष
१ संगिता मखरे (आघाडी),
राजू लोखंडे (आघाडी)
२ गणेश भोस (आघाडी),
सुनीता खेतमाळीस (भाजप)
३ दीपाली औटी (भाजप),
संग्राम घोडके (भाजप)
४ मनोहर पोटे (आघाडी),
वनिता क्षीरसागर (भाजप)
५ मनीषा वाळके (भाजप),
शहाजी खेतमाळीस (भाजप)
६ अशोक खेंडके (भाजप),
मनीषा लांडे (भाजप)
७ निसार बेपारी (आघाडी),
सोनाली घोडके (आघाडी)
८ ज्योती खेडकर (भाजप),
रमेश लाढणे (भाजप)
९ छाया गोरे (भाजप),
सीमा गोरे (आघाडी),
संतोष कोथिंबिरे (आघाडी)

❌ प्रमुख पराभूत उमेदवार
- नगराध्यक्षपद: सुनीता शिंदे (भाजप) — २,१०० मतांनी पराभव..
२०१९ मध्ये भाजपने बहुमत मिळवूनही नगराध्यक्षपद गमावल्याने पक्षाच्या गोटात अंतर्गत नाराजी वाढली होती, तर आघाडीने सत्ता मिळवून स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत केली होती. आत्ता काही दिवसांतच पुन्हा एकदा श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक रंगणार असून मतदारांचा कौल यावेळी कोणाच्या बाजूने लागतो..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(तांत्रिक विश्लेषण आणि गुगल वरून)


Advertise…

Catalog Name:Nutrovally | Chia Seeds | 800 gm
Brand: NUTROVALLY
Container Type: Plastic Bottle
Flavour: Plain
Form: Seeds
FSSAI License Number: 13320010000464
Net Quantity (N): 4
Shelf Life (Best Before): 18 Months
Speciality: Gluten Free
Veg/NonVeg: Veg
Weight: 200gm
Dispatch: 1 Day
*Proof of Safe Delivery! Click to know on Safety Standards of Delivery Partners- https://ltl.sh/y_nZrAV3
