दिनांक २३ मार्च २०२३, श्रीगोंदा:
तालुक्यांत दुध भेसळ खोरांचा हैदोस वाढला असला तरी श्रीगोंदा तालुक्यांतील जनता जागरूक असल्याने उशीरा का होईना पण या प्रकरणी सामजिक एक्य दाखवत श्रीगोंदा वासियांनी दुध भेसळ करून सर्व सामान्यांच्या जीविताशी खेळु पाहणाऱ्या भेसळ माफियांवर कारवाईसाठी व्यापक मोर्चा काढत कारवाईची मागणी केली आहे.
आज सकाळी ११:०० वाजता सर्व पक्ष, संघटना एकत्र येत दुध भेसळ खोरांवर कारवाईची मागणी करण्यात आली. अनेकांनी यावेळी दुधात केमिकल मिक्स करुन आपला स्वार्थ साधणाऱ्या अपप्रवृती विरोधात व्यापक आंदोलन उभारण्याचे मत व्यक्त केले.
दारात गाई नाहीत तरीही शेकडो लिटर दुध विक्री होत आहे. स्वार्थापोटी दुधात वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे सामान्य जनतेसह मुलाबाळांना कॅन्सर सारख्या जिवघण्या रोगांना सामोरे जावे लागेल अशी भीती यावेळी बोलतांना काहींनी व्यक्त केली. नमूद प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच सार्वजनिक हितासाठी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल अशी सूचनाही काही जानकर लोकांनी यावेळी केली आहे.
या आंदोलनात अनेकांनी सहभागी होऊन आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात दूध भेसळीचा मास्टरमाइंड शोधण्यात यावा, दूध भेसळ करणारे रॅकेट संपूर्ण राज्यात सक्रिय असून उध्वस्त करण्यात यावे, सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अन्न व औषध प्रशासन अधिकारी उमेश सूर्यवंशी व जावेद शेख यांच्यामुळे नगर जिल्ह्यात रॅकेट फोफावले असून त्यांना बडतर्फ करून त्यांना सह आरोपी करण्यात यावे व लाच लुचपत विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, दूध भेसळ करणारे सर्व प्लांट सील करण्यात यावेत या भेसळीतून कमावलेली संपत्ती व बँक खाते गोठविण्यात यावेत तसेच इन्कम टॅक्स विभागामार्फत धाडी टाकण्यात यावे, दूधभेसळ करणाऱ्या विरुद्ध केंद्र राज्य सरकारने जन्मठेपेची शिक्षा देणारा कायदा करावा, नशेचे इंजेक्शन रॅकेट-स्वीट होम मधील खाद्यपदार्थ मधील भेसळ व टेस्टिंग पावडर वापरण्यास प्रतिबंध करावा. अश्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या धडक मोर्चा व निषेध सभेला बाबासाहेब भोस, डॉ. प्रनोतीमाई जगताप, ॲड. संभाजी बोरुडे, बाळासाहेब नाहटा, टिळक भोस, आदेश नागवडे, राजेंद्र उकांडे, बाळासाहेब बळे, भाऊसाहेब खेतमाळीस, पांडूरंग राऊत, दिपक शिंदे, जहीर जकाते, दत्ता पानसरे, गोरख घोडके, काका कदम, विजय शेंडगे, संपत मोरे, नीलेश गोरे, नगरसेवक बापुशेठ गोरे, सुनिल वाळके, संग्राम घोडके, रमेश लाढाने, राजेंद्र भोस, संतोष क्षिरसागर सह बहुसंख्य लोकं उपस्थित होते.
या आंदोलनात ॲड. संभाजी बोरुडे, टिळक भोस, डॉ. प्रनोतीमाई जगताप, दत्ता पानसरे, बाळासाहेब नाहटा सह बाबासाहेब भोस यांनी आपले मत व्यक्त केले.
स्त्रोत:(आयोजित आंदोलन)

