दिनांक २१ जुन २०२४, कोळगाव, श्रीगोंदा:
रयत शिक्षण संस्थेच्या श्री कोळाईदेवी विद्यालयामध्ये जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक शहाजी हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
मुख्याध्यापक शहाजी हिरडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना जागतिक योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि मानवी जीवनातील योगाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे महत्त्व समजावले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रीगोंदा येथील श्री महादजी शिंदे विद्यालयाचे शिक्षक व योगाभ्यासक कैलास आठरे सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांनी योगाच्या नियमित सरावामुळे होणारे फायदे समजावून दिले आणि विद्यार्थ्यांना सतत योगा करण्यासाठी प्रोत्साहित केले. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने योगासने करून कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक संजय ठोकळ आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख मंजुश्री धीवर यांनी नियोजन केले. विद्यालयाचे जेष्ठ कलाशिक्षक डी.टी. गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.
स्रोत: (पत्रकार महेश शिंदे)


