धनंजय चांडेकडून आरोग्य विभागास face shield चे वाटप.

दिनांक १४ सप्टेंबर,श्रीगोंदा:

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता, काष्टी गावातील सामाजिक कार्यकर्ते धनंजय (भाऊ) चांडे व अमित शेटे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील आरोग्य केंद्रात आज सर्व कर्मचाऱ्यांना FACE SHIELD चे वाटप केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर व कर्मचारी उपस्थित होते.

धनंजय चांडे यांनी सामाजिक प्रक्रियेतून कोरोना प्रादुर्भावात समाजासाठी झटणाऱ्या पत्रकार, पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार यांना सॅनेटायझर, मास्क, face shield चे वाटप करून कामांबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वसामान्यांसाठी आपला जीव धोक्यात घालून सदरील कामगार, कर्मचारी व अधिकारी काम करत असल्याने, सामाजिक जाणिवेतून असा उपक्रम राबवत असल्याचे चांडे यांनी माध्यमांना सांगितले आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading