पाणी टंचाई आणि उसाला भावाची हमी मिळत नाही त्यामुळे उसाची गोड कहाणी कडू होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत अजनुज येथील युवा शेतकरी प्रविण ज्ञानदेव गिरमकर याने उस शेतीत नवे तंत्रज्ञान आणले रासायनिक व सेंद्रीय खतांचा मेळ घालत उसाचे एकरी १०० टनापेक्षा अधिक उत्पादन काढण्यासाठी स्व : ताचा एक फॉर्म्युला तयार केला त्यामुळे प्रविण गिरमकर हा उसाच्या उत्पादनात सेंच्युरी ठोकणारा सेंच्युरी मॅन युवा शेतकरी म्हणून पुढे आला आहे.
प्रविण गिरमकर यांना वडिलोपार्जित १२ एकर शेती रवि, पवन हे तीन बंधूच एकत्रीत कुंटुब. प्रविणने बी.ए.ची पदवी संपादन केली नोकरीचा नाद सोडून शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. भीमा नदीमुळे अजनुज परिसरात भरपूर पाणी अशा परिस्थितीत प्रविण ने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाच एकर उसाची शेती फुलली पहिल्या वर्षी एकरी ८० % मे.टन उसाचे उत्पादन काढले. आणि उसाचे एकरी जादा उत्पादन काढणारा शेतकरी म्हणून प्रविण गिरमकर हे नाव फोकसला आले.
भीमा नदीच्या क्षारयुक्त व प्रदुषण धारी पाण्यामुळे प्रविण गिरमकरचे सर्व ठिंबक सिंचन निकामी झाले. अशा परिस्थितीत प्रविणने आपले बंधू रवी, पवन यांच्या मदतीने उसाचे एकरी उत्पादन एकरी ११० मे. टनापर्यंत घेण्यात यश मिळविले.
उत्पादनात सेंच्युरी ठोकणारा युवा शेतकरी म्हणून कृषी विभागाने त्यांची ओळख निर्माण केली आणि महाराष्ट्रातील उस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन व जनजागृती होण्यासाठी प्रविण गिरमकरची ठिकठिकाणी व्याख्याने आयोजित केली. प्रविणने एकरी १०० मे. टन उत्पादन घेण्याचा फॉर्म्युला शेतकऱ्यांना सांगितला.
शंभर मेटन उसाची गुरुकिल्ली
उस जात २६५ किंवा ८६०३२ जमिनीची प्रत पाहुन निवड. पाच फुटी सरीवर एक डोळा पध्दतीने २४५ फुटावर टिश्यूक्लचर रोपांची लागवड पावसाळी हंगामात करणे. उस लागवडी पुर्वी एकरी १०० गोण्या कोंबडी खत. लागवडीनंतर तीन वेळा रासायनिक खते यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश यांचा योग्य प्रमाणात वापर करताना सुक्ष्म अन्न द्रव्य खताच्या उसावर फवारण्या आणि उस लागवडीनंतर बालपणी पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी ह्युमीक ऍसिडचा वापर ही यशाची गुरुकिल्ली आहे.
शिवशंभो कृषी विज्ञान मंडळ प्रविण गिरमकर यांनी उसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी जनजागृती करणे व सामुहिक पध्दतीने उस शेती करण्यासाठी शिवशंभो कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. आणि उसाचे क्षेत्र असलेल्या भागात जनजागृती केली. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.
सेंद्रीय व गांडूळ शेती रासायनिक खताचा वारेमाप वापर झाल्याने जमिनीचा पोत खराब झाला आहे. त्यामुळे आता जमीन रासायनिक खतांचा उत्पादन वाढीसाठी प्रतिसाद देत नाही. तिची क्षमता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सेंद्रीय व गांडूळ खतांचा वापर केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मी सेंद्रीय व गांडूळ खतांचा वापर सुरू केला आहे.
श्रीगोंद्यातील उस शेतीचा गोडवा कमी श्रीगोंदा तालुकात उसाचे आगार म्हणून ओळखला जात होता चार साखर कारखाने उभे राहिले श्रीगोंदेकरांच्या उसाचा गोडवा महाराष्ट्रातील बहुतेक साखर कारखान्यांनी चाखला आहे पण पाणी टंचाई मुळे उसाचे क्षेत्र व उत्पादनात मोठी घट झाली आहे त्यामुळे साखर कारखानदारी आडचणीत सापडली आहे त्यामुळे कमी पाण्यात उसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी प्रविण गिरमकर सारख्या शेतकऱ्यांचे अनुभव साखर कारखान्यांनी शेतात उतरविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे अन्यथा एक दिवस श्रीगोंद्यातील हजार कोटीची गुंतवणूक असलेली साखर कारखानदारी मोडीत निघण्याची भिती निर्माण झाली आहे. प्रविण गिरमकर अजनुज
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशनाच्या वेळेची आहे.
