दिनांक २३ जून(काष्टी,श्रीगोंदा):
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता, शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. या कालखंडात सामान्य लोकांना बाहेर येण्यास प्रतिबंध आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशासकीय कर्मचारी जसे की महसूल, पोलीस, नगरपरिषद, आरोग्य विभागाचे पदाधिकारी उपाययोजना व प्रतिबंधासाठी रस्त्यावर उभे आहेत.
याचबरोबर तालुक्यातील पत्रकारही यांच्या खांद्याला खांदा देऊन कार्यरत आहेत आणि आपले कर्तव्य बजावतायेत. प्रशासनाची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार बांधव करीत आहेत. या सर्वांचे अभिनंदन करीत त्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत. यासाठी काष्टी गावातील धनंजय (भाऊ) चांडे या तरूणाने श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पोलिस बांधवांना face sheild चे वाटप केले आहे. यावेळी पो. नि. दौलतराव जाधव उपस्थित होते.
काष्टी गावातील राजमुद्रा व जानताराजा तरूण मंडळातील सुनिल मोरे, तुषार कळसकर, महेश मोरे, बंडू पाचपुते, पांडुरंग पाचपुते, डॉ. सतिष माने, निलेश कोकाटे, शहाजी भोसले, मुकुंद पाचपुते, किरण जगताप, अमोल पाचपुते इत्यादी सामाजिक श्रेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेऊन पोलीस बांधवांना या face sheild चे वाटप केले आहे.
(स्रोत:धनंजय चांडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
