दिनांक १० नोव्हेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील तरुण सामाजिक कार्यकर्ते तसेच उपेक्षित, वंचित घटकांची व्यथा समजून त्यांना वेळप्रसंगी मदत करणारे राजेश डांगे यांचा १० नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने त्यांनी गरजु लोकांना दिवाळीचे फराळ व किराणाचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. उपेक्षित व दुर्लक्षित असलेल्या समाजघटकांना वाढदिवसाच्या निमित्ताने छोटीसी मदत दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर खुलणारे हसू मनाला समाधान देणारे आहे. अशी प्रतिक्रिया राजेश डांगे यांनी या निमित्ताने माध्यमांना दिली आहे.

नगरसभा आंदोलन हे संघटन नागरी सुविधांसाठी स्थापन करून, राजेश डांगे यांनी गेल्या ५ वर्षात सामाजिक कार्य करताना दरवर्षी गरिबांना किराणा, फळे, घोंगडी सह आवश्यक वस्तूंचे वाटप केल्या आहेत.
यावर्षी कोरोनामुळे गरिबांना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी वाढदिवस १० नोव्हेंबर रोजी असून, निराधार व दुर्लक्षितांची दिवाळी साजरी व्हावी म्हणून, दोन दिवसांपासून किराणा तसेच दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. राजेश डांगे यांच्या उपक्रमाचे नागरिक, सामाजिक संघटनां कौतुक करीत आहेत.
स्रोत:(मिळालेली माहिती)
