पेडगाव ग्रा.पं.तर्फे सॅनिटायझरचे वाटप..

दिनांक ४ एप्रिल (पेडगाव,श्रीगोंदा):

गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये.घर,परिसर आणि व्यक्तीगत स्वच्छता राखावी. म्हणून,पेडगाव ग्रामपंचायत तर्फे गावातील लोकांना सॅनिटायझरचे वाटप करीत कोरोना आजरा संदर्भात जनजागृती करण्यात आली.

सरपंच सौ.सुलोचना भगवानराव कणसे यांनी घरोघरी जाऊन सॅनिटायझरचे वाटप केले. लोकांनी स्वच्छता कशी राखावी याबद्द्ल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी श्री भगवानराव कणसे, (उपसरपंच) देविदास शिर्के, (ग्रा.पं. सदस्य) प्रेमकुमार खेडकर, दत्तात्रेय ओगले, इरफान काझी , प्रकाश घोडके , जालिंदर खेडकर, नारायण कणसे, संतोष खेडकर ,राजेंद्र पंडित , जंजिरे सर , प्रियंका गोधडे, मनीषा राऊत सर्वांनी आपापल्या वार्डमध्ये सँनीटायझर वाटण्यासाठी सहकार्य केले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोसियल डिस्टनसींग चा अवलंब करा, स्वतः सह परिसर स्वच्छ ठेवा ,सरकारी नियमांचे उल्लंघन करू नका,स्थानिक महसूल,पोलीस व आरोग्य यंत्रणेस सहकार्य करा,खोकताना, शिंकताना फडक्याचा किंवा रुमालाचा वापर करा अश्या प्रकारे स्थानिक पेडगावकरानां ग्रामपंचायत मार्फत सूचना देण्यात आल्या आहेत.

(वार्तांकन व छायाचित्रे :शफिक भाई हवालदार, पेडगाव)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading