दिनांक २२ नोव्हेंबर(अनगरे,श्रीगोंदा):
तालुक्यातील अनगरे येथे वीस वर्षीय तरुणास लोकांच्या गोठ्यातील जनावरांचे शेण काढतो. मात्र, आमच्या जनावरांचे शेन काढत नाही. याचा राग अनावर होऊन मागासवर्गीय तरुणाला जबरी मारहाण करण्यात आली आहे. शिवाय शेण काढले नाही तर जीव मारून टाकीन अशी धमकी पीडितास देण्यात आली आहे. या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजही उच्च वर्णीय समजणाऱ्या समाजातील काही लोकांची मानसिकता बदललेली दिसत नाही. पुरोगामी म्हणवनार्या महाराष्ट्रातील खेडोपाडी, गावांमध्येही जातिवादी, साधारण लोकांवर आपली दहशत बनवून गैरसंविधानिक कामे करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. घानीशी संबंध असलेली कामे करून घेण्यास प्रतिबंध असतानाही. अशा प्रकारची कामे किंवा शेन उचललं नाही, मैला उचलला नाही, घाण उचलली नाही. म्हणून, आजही मारहाण होत आहे. विशेषता मागासवर्गीय समाजातील लोकांबाबत ह्या घटना घडताना दिसत आहेत.
याप्रकरणी सविस्तर असे की, तालुक्यातील अनगरे या ठिकाणी दिनांक २० नोव्हेंबर रोजी सोमनाथ बाप्पू जोगदंड हा तरुण संध्याकाळी आठ वाजता घरी रडत ओरडत आला. याबाबत घरच्यांनी विचारणा केली असता, त्याने नमूद प्रकार सांगितला. लोकांच्या गोठ्यातले शेन काढतो, आमच्या जनावरांचे शेण काढायला येत नाही. म्हणून, अजनुज रोडवर लाकडी दांडक्याने सोमनाथला मारहाण करण्यात आली. ऋषिकेश घोलप याने ही मारहाण केली आहे. शिवाय पीडिताच्या घरासमोर मोटर सायकलवरून जाऊन ऋषिकेश घोलपने घरच्या लोकांना दरडावून सांगितले की, सोमनाथला शेन काढायला सांगा, नाहीतर ! मी त्याला जीव मारुन टाकील, म्हणत घरच्यांनाही शिवीगाळ करीत अश्लील भाषा वापरली.

नमूद घटनेनंतर पीडितांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद नोंद केली असून, ऋषिकेश दत्तू घोलप राहणार अनगरे तालुका श्रीगोंदा, याच्या विरोधात भा.दं.वि. कलम ३२४, ५०४, ५०६ तसेच ॲट्रॉसिटी चे ३(१)r व ३(१)s नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दाखल केला असून, पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव पुढील तपास करीत आहेत.
स्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून)
