अहमदनगर जिल्ह्यामध्ये व्यापक जनआंदोलन उभारणार: दीपक भाऊ केदार(राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना)..

दिनांक २४ नोव्हेंबर,श्रीगोंदा:

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार हे कोपर्डी येथील पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी घटनास्थळी जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या शिंदे कुटुंबातील अत्याचार घटनेचा पाठपुरावा करून, त्यांचे सांत्वन करण्यासाठी केदार पदाधिकार्‍यांसह आज दुपारी तेथे उपस्थित राहणार आहेत.

कोपर्डी येथील मागासवर्गीय कुटुंबाच्या अत्याचार प्रकरणासंदर्भात पीडितांना भेट देण्याच्या उद्देशाने दिपक भाऊ अहमदनगर जिल्ह्यात आले आहेत. यावेळी श्रीगोंदा येथे कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. काल दिनांक २३ नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह, श्रीगोंदा येथे कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये दलित, आदिवासी अत्याचारांची प्रकरणे वाढत चाललेली आहेत. जिल्हा मागासवर्गीय अत्याचारग्रस्त जिल्हा घोषित होन्याच्या मार्गावर आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील मागासवर्गीयांच्या अत्याचारातील घटनांबाबत ऑल इंडिया पँथर सेना विशेष लक्ष घालुन व्यापक जनआंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. याठिकाणी तालुका पदाधिकारी सह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीगोंदा तालुक्यातील अनुसूचित जाती जनजातींच्या संदर्भातील गंभीर अन्याय प्रकरणाविषयी माहिती घेताना, लिंपणगाव जळीतकांड प्रकरण, ढवळगाव येथील जनाबाई बोरगे जळीतकांड प्रकरण, चिंभळ्यातील अंत्यविधी प्रकरण त्याचबरोबर भानगाव येथील आदिवासी महिलेच्या नग्न मारहाण प्रकरनासह लहान मुलाच्या खून प्रकरनांबरोबर तालुक्यातील विविध SC-ST च्या अन्याय, अत्याचार प्रकरणांची यावेळी सविस्तर चौकशी करून, दिपक भाऊ केदार यांनी माहिती घेतली आहे.

तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात वाढत असलेले अत्याचाराचे प्रकरण लक्षात घेता, अहमदनगर जिल्ह्याकडे विशेष लक्ष देऊन जिल्ह्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा रुजविण्यासाठी जनआंदोलन निर्माण करण्याची तयारी ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमांतून करणार असल्याची ग्वाही दीपक भाऊ केदार यांनी याप्रसंगी दिली आहे.

याठिकाणी दीपक भाऊ केदार (राष्ट्रीय अध्यक्ष), विनोद भोळे (महाराष्ट्र अध्यक्ष), दादाराव ढोले (विद्रभ कार्याध्यक्ष), बंटी भाई सदाशिव (मराठवाडा युवक अध्यक्ष), (पिंपरी चिंचवड शहर अधक्ष) बाळासाहेब शेंडगे, (युवक जिल्हाध्यक्ष,औरंगाबाद) अनिल त्रिगोटे, (कामगार आघाडी) राजुभाई खरात, औरंगाबाद, अमर घोडके (जिल्हा उपाध्यक्ष,अहमदनगर), अक्षय आठवले (शहराध्यक्ष, श्रीगोंदा), अशितोष चव्हाण, अभिजीत सोनवणे सह पदाधिकारी उपस्थित होते.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दीपक भाऊ केदार व त्यांच्या समवेत आलेल्या पदाधिकाऱ्यांचे तालुक्याच्यावतीने स्वागत केले आहे.

स्रोत:(मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार)..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading