आई वडिलांचे कष्ट विसरू नका, यश अवश्य मिळेल.. : डी.वाय.एस.पी. अण्णासाहेब जाधव..

दिनांक २० फेब्रुवारी, श्रीगोंदा:

शहरातील तुळशीदास मंगल कार्यालयात अग्निपंख फाउंडेशन आयोजित करिअर मोटिवेशन्स व जवानांचा सन्मान याप्रसंगी उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी अरुणराव आनंदकर (उप जिल्हाधिकारी नाशिक) तसेच अण्णासाहेब जाधव (पोलीस उपविभागीय अधिकारी कर्जत, उपविभाग) आणि गुलाबराव सय्यद (गट शिक्षण अधिकारी श्रीगोंदा पंचायत समिती) याचबरोबर यजुवेंद्र महाजन (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, जळगाव) इत्यादी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना अग्निपंख फाउंडेशनने व्यक्त होण्यासाठी दिलेला विषय “मी कसा घडलो” याविषयी बोलतांना त्यांनी त्यांच्या जीवनातील खडतर प्रवासाविषयी माहिती दिली. आई-वडिलांसोबत काम करत असतांना, आलेले विचित्र अनुभव त्यांनी या ठिकाणी नमूद केले. शालेय जीवनात असेच ज्येष्ठ मार्गदर्शक आम्हालाही मार्गदर्शन करण्यासाठी येत असतं. असा आठवणींचा उजाळा त्यांनी उपस्थितांसमोर दिला. शिक्षण करतांना यश अवश्य येईल, कोणतेही काम करतांना ते पूर्ण करण्याची उर्मी मनात ठेवा आणि हे सर्व पार पाडताना आई-वडिलांना विसरू नका.अवश्य यश मिळेल. अशा सोप्या आणि साध्या भाषेमध्ये अण्णासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांसमोर त्यांचा जीवनपट नमूद केला. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पोलिसही एक माणूस आहे. त्याला ही भावना आहेत, त्यालाही मन आहे. यावेळी एका अंधश्रध्दाळू व्यक्तीचं उदाहरण त्यांनी सांगितले. आजारी असलेल्या व्यक्तीने झाडाखाली बसून फुग्यांमध्ये चिठ्ठी ठेवून देवाला पत्र पाठवले, नेमका तो फुगा येऊन पोलिस स्टेशनच्या आवारात पडला. त्यात त्याने पाठवलेली चिठ्ठी हाती लागली. पोलिसांनी परिस्थिती समजून घेत, त्या सर्वांनी पैसे जमऊन नमूद पत्त्यावर पाठवले, पैसे त्या व्यक्तीला भेटल्यानंतर जी रक्कम पाठवायला देवाकडे मागणी केली होती, त्यातील काही पैस पोलिसांनी घेतले. अशा पद्धतीचा अपभ्रंश करून, त्या व्यक्तीने चुकीचा विपर्यास केल्याचे, त्यांनी सांगितले. ऊन, वारा, पाऊस अनेक वेळा चरम परिस्थितीमध्ये काम करणारा पोलीस हाही एक माणूस असल्याने, त्याकडे माणूस म्हणून, पहा. असे आवाहन यावेळी अण्णासाहेब जाधव यांनी उपस्थितांना केले.

यानंतर अरुणराव आनंदकर उप जिल्हाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर यजुर्वेंद्र महाजन (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, जळगाव) यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये आपला आत्मविश्वास वाढवण्याबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सांगितले. आपण अनाथ, अपंग आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करतो. त्या विद्यार्थ्यांच्या वेदना आणि अडचणी किती भयानक आहेत ? याबाबत त्यांनी उदाहरणे स्पष्ट केली. या अडचणींसमोर आपल्या अडचणी अगदीच नगण्य असल्याचे त्यांनी या वेळेस स्पष्ट केले. उपस्थितांना अधिक मार्गदर्शन आवश्यक असल्यास त्यांनी त्यांच्या संस्थेशी संपर्क साधावा किंवा त्यांच्या केडरमध्ये भाग घ्यावा. असे त्यांनी आवाहन केले. जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या नकारात्मक गोष्टींना सोडून आपण पुढे वाटचाल करीत, ध्येय गाठावे. असे त्यांनी या ठिकाणी नमूद केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले. त्या प्रश्नांमधून त्यांनी योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुण्यनगरी वृत्तपत्राचे पत्रकार विशाल चव्हाण यांनी केले. तर, कार्यक्रमाचे आयोजन अग्निपंख फाऊंडेशनचे बाळासाहेब काकडे यांनी केले. यावेळी विचार मंचावरील मान्यवरांसह महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते.

स्त्रोत:(अग्निपंख फाउंडेशनने तुळशीदास मंगल कार्यालयात घेतलेला कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading