कुकडीच्या अधीक्षक अभियंता धुमाळांंसह चाऱ्यांची केली पाहणी.घोडचे आवर्तन २५ एप्रिल पासून सुरू..
दिनांक १९ श्रीगोंदा:
कुकडीचे आवर्तन श्रीगोंद्यासाठी सुरू झाले आहे. काही ठिकाणी उपसा झाल्याने गेजच्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र,कोणी ही काळजी करू नये. पाटकऱ्या पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण सर्वांच्या संपर्कात आहोत. पाण्यासाठी आपण सतर्क असून,सर्वांचे भरणे पूर्ण होईल, असा विश्वास माजी मंत्री व आमदार बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केला. शिवाय घोडचे आवर्तन २५ एप्रिल पासून सुरू होणार असल्याची माहिती ही पाचपुते यांनी दिली.
कुकडीचे (अधीक्षक अभियंता) हेमंत धुमाळ,(उप अभियंता) दिलीप साठे, देशमुख यांच्या सोबत पाचपुते यांनी रविवारी दुपारी तालुक्यातील चारी क्र. ९ ते १४ ची पाहणी केली. यानंतर प्रसिद्धीस माहिती देताना श्री. पाचपुते म्हणाले, “१३२ खलील काही क्षेत्र वंचित आहेत. लॉक डाऊन व गेज कमी झाल्याने त्यात सातत्य राहीले नाही. १३२ ची भर काढणे सुरू आहे. तेथे सर्वाना पाणी मिळेल. शिवाय पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचे ठरणारे लेंडी नाला, घोडेगाव व औटी वाडी, मोहरवाडी तलाव भरले जाणार आहेत. कोणी वंचित राहणार नाही याची पूर्ण काळजी आपण घेत आहोत.”
घोड नदीत पाणी सोडल्याने नदीवरील बंधारे भरत आहेत. भीमा नदीचे पाणी संपले होते. भामाअसखेड मधून पाणी सोडले आहे. त्याचे पाणी अजनुज (ता. श्रीगोंदा) पर्यंत पाणी आले आहे. दोन दिवसात पेडगाव पर्यंत ते पोहचेल. पाण्याच्या नियोजनात आपण कोठे कमी पडणार नाही. काही अडचणी निर्माण झाल्या तर शेतकऱ्यांनी थेट आपल्याशी संपर्क करावा, असे आवाहन पाचपुते यांनी केले आहे.
आमच्या हक्काचं आम्हाला द्या..
कुकडी चे आवर्तन सुरू होऊन महिना लोटला. श्रीगोंद्या साठी आवर्तन सुरू आहे. अधीक्षक अभियंता धुमाळ यांना आपण सांगितले की, “कोणाला काय द्यायचं ते द्या पण आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. ही आमची आग्रही मागणी आहे.” या संदर्भात आपण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत लक्ष्य वेधुच.शिवाय श्रीगोंदा तालुक्यातील आवर्तन पूर्ण झाल्याशिवाय पाणी बंद होणार नाही
बबनराव पाचपुते (आमदार, श्रीगोंदा)
