दिनांक १६ जानेवारी, श्रीगोंदा:
तालुक्यातील चिखली येथील युवक शिवम भाऊसाहेब झेंडे (वय १९ वर्षे) याचा लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्याच्याबरोबरच ओंकार अरुण निमसे(१९), प्रिया सचिन पवार(४०) व शीतल शेषराव चिमखडे(२४) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मार्केट यार्ड, नगर येथे एका दुकानातील चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

अभय मशनरी या चार मजली दुकानात लिफ्ट बसवण्यात आली होती. शनिवारी दुपारी चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली यात शिवमचा मृत्यू झालाय. याबाबत माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. व पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
