दिनांक:१६ जानेवारी, श्रीगोंदा:
संभाजी ब्रिगेड श्रीगोंदाच्या वतीने आज छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४२ वा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक बाबासाहेब भोस, श्रीगोंदा नगरीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक मनोहरदादा पोटे, सतीश मखरे, प्रशांतजी गोरे, हृदयजी घोडके, समीरजी बोरा, राजाभाऊ लोखंडे, निसार बेपारी, राजू गोरे उपस्थित होते.
यावेळी बाबासाहेब भोस, मनोहर दादा पोटे यांनी शंभु राज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शंभूप्रेमींना शुभेच्छा दिल्या. यावेळी बाबासाहेब भोस यांना बुधभूषण हा ग्रंथ भेट दिऊन त्यांचा सत्कार केला गेली.

चार वर्षापासून संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजी महाराज चौकांमध्ये स्मारक व्हावे, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत आहे. या पाठपुराव्याला यश आले आहे. यावेळी मनोहर दादा पोटे यांनी नगरपालिकेच्या माध्यमांतून छत्रपती संभाजी चौकासाठी साठ लाख रुपये निधी मंजूर केला आहे व येत्या १४ मे छत्रपती संभाजी महाराज जयंती पर्यंत स्मारकाचे काम सुरू करणार आहोत, असे आश्वासन दिले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील पहिला अश्वारूढ पुतळा आपल्या श्रीगोंदा शहरात उभारण्यात येणार आहे. याचा सर्व शिव संभु प्रेमींना सार्थ अभिमान आहे. असे मत अरविंद कापसे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष अरविंद कापसे, मोहोळकर सर, तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे, सुनीलराव ढवळे, दिलीपजी लबडे, गणेशजी पारे तालुका उपाध्यक्ष सागरजी हिरडे, शहराध्यक्ष प्रवीणजी धुमाळ, किरण बनसोडे, किरण सप्रे, मयुर आढाव, चंद्रनिल कापसे इत्यादी उपस्थित होते.
स्रोत(प्रसिद्धी पत्र)
