काष्टीतील अपघातात आढळगावच्या इसमाचा मृत्यू..!

दिनांक १८ जानेवारी, श्रीगोंदा:

आढळगाव येथील रहिवासी असलेले मच्छिंद्र भगवान काळे वय वर्षे ४० यांचा काल दुपारी ३:०० च्या सुमारास स्विफ्ट गाडीने मोटरसायकल ला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आहे. accident

काष्टी येथील न्यू लोकसेवा हॉटेल समोर स्विफ्ट क्रमांक MH:४२, BB ३१९८ या गाडीच्या चालकाने हयगईने गाडी चालवून समोरून मोटरसायकलवर येणार्‍या मच्छिंद्र काळे यांच्या मोटर सायकल क्रमांक MH:१६ BP ५९३७ ला जोराची धडक दिल्याने, अपघात झाला.

या अपघातात मच्छिंद्र काळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत संजय मोहन काळे, आढळगाव यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर दिली.

यानंतर स्विफ्टच्या अज्ञात चालकावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भांदवी ३०४(अ), मोटर वाहन नियम २७९, १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील गुन्हा पोलीस हवालदार झुंजार बाप्पू यांनी दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भैलुमे करीत आहेत.

स्त्रोत:(दाखल गुन्हा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading