श्रीगोंदा नगरपालिका असो किंवा आमदारकी, किती निवडणुका याठिकाणी आश्वासन देत राजकारण केलं गेलं.?

दिनांक २७ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

आंबील ओढा, रायकर मळा साठवण बंधारा हा सन २०२० – २१ या कालावधीत तयार झालेला आहे. नव्याने झालेल्या बंधाऱ्यामुळे परिसरामधील मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली येणार आहे.

या बंधाऱ्यावर गेली तीस वर्षे राजकारण झालेले आहे. नगरपालिका इलेक्शन असो, किंवा आमदारकी, किती इलेक्शन आजपर्यंत आश्वासन देते या ठिकाणी राजकारण झालंय.? पूर्वी काही राजकीय पुढाऱ्यांनी इलेक्शन जवळ आलं की, पायाचे खोदकाम केलतं, या खोदलेल्या नदीपात्रात पोहत असतांना अंदाज न आल्याने एका मुलाला दुर्दैवाने येथे जीव गमवावा लागला होता.

आश्वासन देऊन उशिरा का होईना, बंधारा झाला. मात्र, यावरून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांमध्ये परस्पर विरोधी भांडण तंटे होत आहेत. या दोघांच्या भांडणामुळे ८५ लाखाचा बंधारा कोरडा राहत असून, स्थानिक स्तर लघु पाटबंधारे या खात्याकडे या बंधाऱ्याचा कार्यभार आहे. पण, ते दुर्लक्ष करीत आहेत.

Whether it is Shrigonda Municipality or MLA, how many elections have been held here by promising politics.?

स्थानिक स्तरचे अधिकारी दुर्लक्ष देत असल्याने स्थानिक आजी-माजी नगरसेवकाने यामध्ये लक्ष घालावे. असे संभाजी ब्रिगेड (तालुकाध्यक्ष) नाना शिंदे हे तहसीलदार मिलिंद कुलथे यांना नमूद विषयासंदर्भात लवकरच भेटणार असल्याचे माध्यमांना प्रसिद्धी पत्र दिले आहे.

स्रोत:(नाना शिंदे,संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading