दिनांक २९ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
तालुक्यात विविध प्रशासकीय कार्यालय आहेत. आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, जलसंधारण, कृषी, फॉरेस्ट, सार्वजनिक बांधकाम या आणि अशा अनेक कार्यालयांमध्ये सर्वसामान्य लोकांची कामे असतात.
मात्र, येथील स्थानिक अधिकारी लोकांचे काम करत नसतील. तर, ते पीडित आपले काम घेऊन, तालुक्याचे न्याय दंडाधिकारी अर्थात तहसीलदार जे तालुक्याचे प्रमुख आहेत. यांच्याकडे जातात किंवा त्यांच्या दारात उपोषण करून मागण्या पूर्ततेसाठी आग्रह करतात. मात्र, श्रीगोंद्याचे तहसीलदारांनी आज त्यांच्या कार्यालयात विषय घेऊन आलेल्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना हे काम माझ्या अखत्यारीतील नसून, तुम्ही संबंधित कार्यालयात जा.! असे सुचवल्याने सर्वांनीच तोंडात बोट घातले आहे.!
यामुळे संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थेट ज्या कार्यालयातील काम आहे. तेथे जाऊन त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला बेशरम झाडाच्या पानांचा हार घातला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहराजवळ असणाऱ्या आंबील ओढ्यावर रायकर मळा येथे गेल्यावर्षी लघु पाटबंधारे विभागाने तब्बल ८७ लाख ६३ हजार ४२३ रुपये खर्चून कोल्हापूर साठवण बंधारा बांधला आहे.
याची सिंचन क्षमता २५ हेक्टर आहे. परंतु, बंधाऱ्याच्या जवळील शेतकऱ्यांचा, हद्दीवरून वाद निर्माण झाला आहे. याविषयी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व लाभार्थी शेतकरी, तहसीलदार मिलिंद कुलथे साहेबांना याविषयी भेटले असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे आमची निराशा झाल्याचे मत येथे उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

तालुक्याचे प्रमुख हे न्यायदंडाधिकारी असतात. खालच्या यंत्रणेने काम टाळल्याने संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे नमूद गाऱ्हाणे मांडले. तर, संबंधित खात्याच्या साहेबांकडे जा. हा माझा विषय नाही. असे तहसीलदारांनी सांगितले.
संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन, अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रात नाहीत म्हणून, फोन करून विचारले असता, साइटवर आहे, बाहेर आहे. अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाना शिंदे यांनी सांगितले.

तहसीलदारांनी सांगितल्याप्रमाणे उप विभागीय जलसंधारण अधिकारी, श्रीगोंदा यांच्या कार्यालयात पदाधिकारी गेले. अनं, कार्यालयात अधिकारी नसल्यामुळे संतप्त संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व लाभार्थी शेतकऱ्यांनी बेशरमच्या पानापासून बनवलेला हार त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला घालून, निषेध व्यक्त केला आहे.
याप्रकरणी लवकरात लवकर, येथील शेतकऱ्यांना न्याय मिळावा. अन्यथा.! याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केला आहे. Unsatisfactory answer of Shrigonda tehsildar.? Shameless defeat of disgruntled activists on the officer’s chair ..!
यावेळी संभाजी ब्रिगेडचे (मा.तालुकाध्यक्ष) अरविंद कापसे, (तालुकाध्यक्ष) नाना शिंदे, देविदास रायकर, ओंकार रायकर, पप्पू रायकर, मयूर आढाव इत्यादी उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
