श्रीगोंदयातील ऊर्दू शाळेत “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन..

दिनांक २९ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

दिनांक २७ ऑक्टोबर २१ रोजी श्रीगोंदा उर्दू शाळेत श्रीगोंदा नगरपरिषदेचे मा.श्री.मंगेश देवरे साहेब (मुख्याधिकारी नगरपरिषद श्रीगोंदा) यांच्या विद्यमाने “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, (आजादी काअमृत महोत्सव), कागदी काम, आकाश कंदील बनवणे. या स्पर्धा घेण्यात आल्या. या सपर्धेमध्ये शाळेत विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.

या प्रसंगी शि.पा.संघ (अध्यक्ष) वसीम ताडे, श्रीगोंदा नगरपरिषदचे (अधिकारी) मा.श्री.लोंढे यांच्या हस्ते या स्पर्धेत प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी, सोनवणे मॅडम, साहिल तांबोळी, होले, पंडित उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना “माझी वसुंधरा” अभियानाची शपथ दिली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी शाळा सुधार समिती (अध्यक्ष) अख्तर भाई शेख यांचे मार्गदर्शन लाभले. Organizing various competitions under “Majhi Vasundhara” campaign in Urdu school in Shrigonda.

शाळेच्या (मुख्याध्यापिका) साचे मॅडम यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व आभार मानले. यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.

स्रोत:(मोमीन सर, ऊर्दू शाळा, श्रीगोंदा)

Leave a Reply