दिनांक २७ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
अॅड. डॉ.अरुण जाधव ग्रामीण विकास केंद्र, जामखेड या संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून श्रीगोंदा तालुक्यातील अनाथ, निराधार, वंचित, भटके-विमुक्त, आदिवासी समाजासोबत आपल्या समाजकार्याची आणि संकट काळात मदतीची नाळ नेहमीच जोडून आहेत.

कोरोनाच्या महाभयंकर संकटात ग्रामीण विकास केंद्र संस्थेने श्रीगोंदा तालुक्यात पाच लाख पंचाहत्तर हजार रुपयाचा किराणा वाटला आहे.

अरुण जाधव हे स्वतः दुसऱ्या समोर झोळी पसरुण, आदिवासी गरीब समाजाला मदत करतात. हे कोणालाही सहज जमणारी गोष्ट नाही. असे संतोष जठार म्हणाले, तर अनंता पवार यांनी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे कौतूक व्यक्त केले.

आज दिवाळीच्या तोंडावर आपली सामाजिक नाळ जोडलेल्या आदिवासी, भटके-विमुक्त, गरजवंत कुटुंबांसोबत ही दिवाळी किराणा देऊन साजरी करण्यासाठी लोणी व्यंकनाथ येथे ५० गरजू कुटुंबांना बाजरी, तांदूळ, साखर, चहा पावडर, तेल, शेंगदाणे, मीठ, तिखट, साबण आशा वीस वस्तूंचे एक किट प्रत्येकी दोन हजार प्रति कुटुंब प्रमाणे वाटप केले आहे.

भुकेच्या वेळी भूकेलेल्यांची भूक भागवणे हाच ग्रामीण विकास केंद्र संस्थेचा उद्देश असून, यासाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू ओहोळ, वैजनाथ केसकर, सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, संतोष चव्हाण, संतोष भोसले, तुकाराम पवार, छाया भोसले, लता सावंत, ज्योती भोसले, मदने उज्वला, जालिंदर शिंदे, सुनिता बनकर, पल्लवी शेलार, काळे मनिषा, कजोरी पवार या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात स्वतःचा विचार न करता भुकेलेल्यांची भूक भागवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
हिच संस्थेची खरी ताकद असून, विशाल पवार हे समता फेलोशिप मध्ये संविधान प्रचारक म्हणून, काम पाहतात. त्यामुळेच मला सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचता येते. असे अॅड.डाॅ.अरुण जाधव नेहमीच सांगत असतात. Distribution of grocery kits at Loni Venkanath in Shrigonda taluka jointly by Rural Development Center, Jamkhed and Coro India Mumbai Samata Fellowship.
किराणा वाटप करताना विशाल पवार अनंता पवार, द्वारका ताई, दिपक माळी, मदने उज्वला, छाया भोसले, कुंडलवार भवन, संतोष भोसले उपस्थित होते.
स्रोत:(संतोष भोसले)
