दिनांक २८ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
विविध योजना व सुविधांपासून दुर्लक्षित असलेल्या गावांपैकी म्हसे, येळपणे, वडगाव शिंदोडी, चिंभळे, पिंपरी कोलंदर, रायगव्हाण मध्ये दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची अतिशय दुरवस्था झालेली आहे.

या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास होत असून, येथे अपघाती क्षेत्र बनलेले आहे. म्हसे ते पिंपरी चौफुला, रायगव्हान ते पिंपरी कोलंदर व वडगाव शिंदोडी ते म्हसे फाटा अश्या रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता.! स्थानिक प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी. अन्यथा.? या पीडित गावकऱ्यांच्या माध्यमांतून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी पुढाकार घेत दिनांक १५ नोव्हेंबर २१ रोजी पिंपरी चौफुल्यावर शिरूर श्रीगोंदा रोड अडवून, रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन सादर केले आहे.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की, नमूद रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. येळपणे, वडगाव शिंदोडी, पिंपरी कोलंदर, चिंभळे, म्हसे, रायगव्हाण या गावातील नागरिकांना दळणवळणासाठी दररोज याच रस्त्याने ये-जा करावी लागते. रस्त्यात खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अपघात क्षेत्र निर्माण झाले आहे.

अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. तरी १५ दिवसांत या रस्त्यांची दुरूस्ती करावी अन्यथा.! वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी पीडित गावकऱ्यांना घेऊन, रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे नमूद केले आहे.

पंचायत समितीचे (गट विकास अधिकारी) शेलार साहेब तसेच, श्रीगोंदा, बेलवंडी पोलीस स्टेशन व तहसीलदार यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. निवेदन देतांना वंचितचे (जिल्हा उपाध्यक्ष) संतोष गलांडे, (जिल्हाध्यक्ष युवक) संतोष जठार, (तालुकाध्यक्ष) संतोष जौजांळ, (युवा नेते) महेंद्र थोरात, (युवा नेते) किरण उबाळे, (जिल्हा संघटक युवक) प्रसाद भिवसने, (शाखा कार्याध्यक्ष) अरुण पठारे, (युवा नेते) प्रमोद उजगरे, प्रमोद काळे, (ज्येष्ठ नेते) कांतीलाल कोकाटे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(निवेदन)
