अनोळखी इसम मृतदेह प्रकरणी श्रीगोंदा पोलीसांचा तपास चालू..

दिनांक २७ ऑक्टोबर, श्रीगोंदा

नगर-दौंड राज्य महामार्गाला लागून असलेल्या शिरसगांव या गावाच्या शिवारात कुकडी चारीवर रविवारी दिनांक २४ ऑक्टोबर २१ रोजी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं परिसरात बघ्यांची गर्दी जमून चर्चेला उधाण आले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी सकाळी कुकडीच्या चारीवर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याबाबत नागरीकांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला कळविले यानंतर घटनास्थळी येऊन, पोलिसांनी तपास करत मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केला.

PSI माळी हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली असून, मृत्यूमागचं गुढ उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंचनामा केल्यानंतर प्रथमदर्शनी हा घातपात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असल्याचे समजते आहे.

बिट अंमलदार झुंजार बाप्पू यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर-दौंड महामार्गावर असलेल्या शिरसगाव परिसरात चारीवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व सविस्तर चौकशी केली. असे सांगितले आहे.

मृतदेहाचे श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नमूद प्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी माळी साहेब यांचे मार्फत चालू असून, नमूद प्रकरणाबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही. Shrigonda police investigation into unidentified ISM body case continues.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

यातील फोटो तुम्हांला विचलित करू शकतील.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading