दिनांक २७ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
तालुक्यातील सहकार क्षेत्रामध्ये सक्रिय कार्यरत असणारे श्री.केशवभाऊ मगर यांना लोकसत्ता परिवारातर्फे “सहकार रत्न” पुरस्कार मिळाल्याबद्दल आज गार गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याचबरोबर नवनिर्वाचित गार विकास सोसायटीचे चेअरमन श्री.राजेंद्र मगर यांची चेअरमन पदी निवडी झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला गार मधील सर्व जेष्ठ सहकारी तसेच, युवक वर्ग उपस्थित होता. भाऊंना पुरस्कार मिळाल्याबद्धल शुभेच्छा देण्यात आल्या.

या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक श्री. अशोकराव मचाले यांनी केले. तसेच, विनायक तात्या मगर, श्री.भुजन शेळके, सदाशिव जाधव, सुभाष देशमुख, श्रीकांत मगर, संतोष देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.केशव पवार हे होते. Mr. Keshavbhau Magar felicitated by Gar villagers for receiving “Sahakar Ratna” award.

यावेळी गार गावचे सरपंच सौ.अलकाताई देशमुख, महादेव खरात, तेजम खरात, आंबासाहेब शिकलकर, बाळासाहेब पवार, मदनराव मगर, सोपानराव शेळके, समीर मगर, सदाशिव मचाले, खिवराज मचाले, मोहन शिपलकर, सचिन मचाले, रमेश मचाले, बाळासाहेब शिकलकर, सिताराम तावरे, अनंत नाईकवाडी, सुनिल जाधव, पांडुरंग मगर, हरीभाऊ शेळके, सोमनाथ जाधव, बबन गावडे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाचे नियम पाळून सदर कार्यक्रम पार पडला.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
