दिनांक २८ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
तालुक्यातील वीज प्रश्नासंदर्भात ऊर्जामंत्री प्राजक्त (दादा) तनपुरे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार त्यांनी दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पुण्यात वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. या बैठकीमध्ये (ऊर्जा आणि आदिवासी विकास राज्यमंत्री) प्राजक्त दादा तनपुरे, (महावितरणचे प्रादेशिक संचालक) संजय ताकसांडे, (महापारेषणचे संचालक) श्री. टोपे, (नियोजन विभागाचे उपसचिव) प्रशांत तडगेळ व (अधीक्षक अभियंता) नवलाखे यांचे सह घनश्याम (अण्णा) शेलार या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार घनश्याम (अण्णा) शेलार यांनी याबाबत काल दिनांक २७ ऑक्टोबर रोजी श्रीगोंद्यातील त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी त्यांनी नमूद केले की, श्रीगोंदा तालुक्यातील सध्याच्या १३२ के.व्ही. सबस्टेशन वर ३३-११ के.व्ही. ची एकूण ८ सबस्टेशन्स जोडलेली आहेत. मात्र, त्या सबस्टेशनवर प्रमाणापेक्षा जास्त भार येत असल्याने, तालुक्यातील ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. यासाठी लोणी व्यंकनाथ स्थित नवीन २२० के.व्ही. सबस्टेशनला जोडण्याची मागणी करण्यात आली होती.

लोणी व्यंकनाथ येथील सबस्टेशनमध्ये दोन ५० एम.व्हि.ए. ट्रान्सफॉर्मर असने गरजेचे असल्याबाबत विषय अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणना. मात्र, त्यासाठी बराच कालखंड लागणार आहे. म्हणून, तात्काळ प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने व काम मार्गी लागावे यासाठी जवळच्या सबस्टेशन्सला लोणी व्यंकनाथ सबस्टेशनमार्फत जोडण्यात यावेत. यामुळे तालुक्याला व्यवस्थित वीज पुरवठा करता येईल. तसेच, २५ एम.व्हि.ए. चा ट्रान्सफॉर्मर शिल्लक असल्यास सबस्टेशनमध्ये उपलब्ध करून, देण्याचा आदेश प्राजक्त दादा तनपुरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला आहे. असे शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पत्रकार परिषदेमध्ये घनश्याम शेलार यांनी नमूद केले की, या बैठकीत ऊर्जामंत्री प्राजक्ता तनपुरे व अधिकाऱ्यांनी आमच्या भावना समजून घेऊन, तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल मंत्री तनपुरे व उपस्थित वीज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. Positive discussion in the presence of ministers and senior officials regarding power issues in the taluka: Ghanshyam Anna Shelar.
स्रोत: (दिनांक २७ ऑक्टोबर २१ रोजी आयोजित श्री. घनश्याम आण्णा शेलार यांची पत्रकार परिषद)

