‘रि.पा.ई.’ जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जामखेडमध्ये एल्गार मोर्चा..

दिनांक ९ ऑक्टोबर २०१५,जामखेड:

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे जिल्हाध्यक्ष मा. सुनिल साळवे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी जामखेड येथे एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सर्व रिपब्लिकन, आंबेडकरवादी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
वेळ आणि मार्ग:

  • वेळ: दुपारी १२.०० वाजता
  • मोर्चा मार्ग: संविधान चौक ते जामखेड पोलिस स्टेशन
    जामखेड पोलिस स्टेशनवर धडकणाऱ्या या मोर्चातून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
    प्रमुख मागण्या:
    मोर्चा आयोजकांनी हल्ल्याप्रकरणी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
    १. गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी.
    २. गुन्ह्याचा सूत्रधार कोण, याचा तपास करून त्याला अटक करावी आणि या खुनी हल्ल्याला ‘पूर्व नियोजित कट’ मानून कलम १२०-ब (कट रचणे) ॲड करावे.
    ३. आरोपींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
    ४. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई साहेब यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या नराधमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
    ५. साळवे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे.
    ६. या प्रकरणाचा खटला ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवावा आणि विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी.
    या हल्ल्यामुळे जामखेड तालुक्यातील आंबेडकरी समाजात तीव्र संतापाचे वातावरण असून, एल्गार मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून न्याय मागण्याची भूमिका आयोजकांनी घेतली आहे.

स्रोत:(सतीश साळवे)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading