नगर, श्रीगोंदा, पारनेर या तीन तालुक्याच्या सीमा रेषेवर असलेल्या उख्खलगाव मध्ये विलास व कैलास वाळके यांचा ३५ एकर पडीक शेतमळा. विलास यांनी सुरूवातीला ३० रू. रोजाने अरणगाव येथे काम केले. तर, कैलासने गावात सायकल पंचर काढण्याचा व्यवसाय केला. पण दोघा भावांनी टॅक्टर घेतले या टॅक्टरच्या व्यवसायातून आधुनिक पध्दतीने शेती करण्याची दृष्टी मिळाली आणि सध्या २५ एकर सुमारे माळरानावर विवीध प्रकारच्या फळ शेतीचा सुंगध दरवळला आहे .
विलास सहादू वाळके व कैलास सहादू वाळके यांना वडिलोपार्जित २० एकर शेती. पाच सहा वर्षांपूर्वी आई वडीलांनी निरोप घेतला विलास हे सातवी पास तर कैलासने दहावीतून शाळा सोडली विलास यांचा मंगलशी विवाह झाला. त्यांना अमोल व अक्षय ही दोन मुल झाली कैलाासचा विमलशी विवाह झाला सारिका आणि प्रमोद, करण ही दोन जुळी मुल झाली असा हा वाळके परिवार.
आई वडील निरक्षर त्यामुळे पंधरा एकरात पोटा पुरत धान्य पिकत नव्हत. विलासने अरणगाव येथे ३० रू. रोजाने मजूरी केली. तर, कैलासने गावात सायकल पंक्चर काढण्याची टपरी सुरू केली. उदरनिर्वाहसाठी लढाई सुरू झाली. विलास एक जुना मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर खरेदी केला. प्रगतीसाठी दुसरी लढाई सुरू केली. दोघा बंधूनी चिकाटीने व्यवसाय केला एकाचे दोन ट्रॅक्टर झाले आणि टॅक्टरच्या चाकाने घरात लक्ष्मी नांदू लागली. पाच सहा वर्षात २० एकर माळरान शेती खरेदी केली.
दुष्काळी भागात शेती करणे आव्हान अशा परिस्थितीत सहा विहीरी बारा बोअर घेतले हक्कांचे पाणी उपलब्ध केले. सुभाष वाळके यांची शेती पाहून त्या शेतीतील पिक पध्दतीत काही बदल करून दोघा बंधूंनी ३५ एकराचा मळा फुलविला दहा एकर डाळिंब दोन एकर नारळ, दोन एकर संत्रा, पाच एकर हनुमान सिताफळ, चिक्कु, तीन एकर लिंबोणी लागवड केली आणि माळरानावर फळबागांचा मधुर सुंगध दरवळला आणि वाळके परिवाराला हक्काचा रोजगार आणि इतर जणांना मजुरी मिळाली.
विलास वाळके यांच्या परिवाराने यशाचे शिखर सर करण्यासाठी फक्त श्रमदेवतेवर विश्वास ठेवला त्यामुळे ३० रू. ची रोजंदारी व सायकल पंक्चर काढणाऱ्या बंधूंच्या जीवनात प्रगतीचे किरण प्रकाशमान झाले यामध्ये विलास वाळके यांचे नियोजन महत्वाचे ठरले आहे.
शेजारी हेच आमचे गुरू
आम्ही अडाणी भाऊ. सुरूवातीला गावात दोन रूपयांची देखील वस्तु उधार देत नव्हते. पण ट्रॅक्टर घेतले प्रगतीची आशा निर्माण झाली. सुभाष वाळके व प्रा. संजय लाकुडझोडे यांची शेती पाहिली आणि तेच चालते बोलते गुरू ठरले. तरुण मुलांनी पाण्याचा अंदाज त्या पध्दतीने पिकांचे नियोजन केले तर शेती नोकरीला मातीत घालीन. तरुणांना धाडस आणि रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल.:विलास वाळके
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.
