बेलवंडी ग्रामपंचायतीकडून मागासवर्गीयांची पिळवणूक.. मंजुर रमाई/शबरी घरकुल योजनेतील ३६ लाभार्थ्यांच्या अनुदानाची जबरदस्तीने वसुली..!

दिनांक १६ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

तालुक्यातील बेलवंडी बु. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी ए.एल.साबळे यांनी त्यांच्या स्थानिक प्रशासनामार्फत रमाई व शबरी आवास योजनेच्या सर्वेक्षणात निवडलेल्या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी देण्यात आलेले अनुदान सक्तीने वसूल करण्यास सुरुवात केलेली आहे. आम्हीं पात्र असतांना ग्रामसेवक स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून, आदिवासी आणि मागासवर्गीयांना त्यांच्या लाभापासून वंचित ठेवत शासकीय अनुदान(रक्कम) असंविधानिक पद्धतीने लोकांना रस्त्यात अडवून सज्जड दम देत वसूलत असल्याचा आरोप केला जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील बेलवंडी गावचे रहिवासी असलेले संतोष आनंदा शिंदे यांना सन २०१८/१९ या वर्षी रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजुर करण्यात आले असुन, ते योजनेचे लाभार्थी आहेत. नमूद योजनेतून शिंदेंना १५०००/- रुपयांचे हप्ता प्राप्त झालेला आहे. ज्यात त्यांनी घरकुलाची पायाभरणी केलीय. पुढील अनुदान मंजुरीसाठी स्वतः ग्रामसेवक साबळे यांनी लाभार्थी सोबत फोटो घेऊन, सदरील प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, अचानक साबळे यांनी शिंदे यांना दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी नोटीस बजावली की, प्रत्यक्ष पाहणीत आपले पक्के घर असुन, सदरचे घरकुल अपात्र ठरविण्यात येत आहे. शिंदें सारख्या ग्रामपंचायत हद्दीतील इतर ३५ लाभार्थीना अश्या सूचना देऊन त्यांना शासनामार्फत देण्यात आलेले अनुदान सक्तीने वसूल केल्याचे समोरं आले आहे.

त्याबाबत विस्तार अधिकारी मालजप्ते आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता.. माती, विटा आणि पत्र्याचे बांधकाम हे पक्के बांधकाम नसुन, स्लॅबचे बांधकाम पक्के बांधकाम समजले जाते.. असे सांगण्यात आलेय. तर, प्रशासकिय मंजुरीत देण्यात आलेल्या नियम अटित याबाबत कोठेही उल्लेख आढळत नाही. शिवाय मंजुरीनंतर घरकूल बांधकाम सुरु करण्यापूर्वी ग्रामसेवकांनी लाभार्थी नियमानुसार पात्र असल्याची खात्री केल्यानंतरच बांधकाम सुरु केले जाते. यामुळे ग्रामसेवकांच्या या कारवाईवर शंका उपस्थित केली जात आहे.

साबळे ए.एल. हे मागासवर्गीय आणि आदिवासी कुटुंबांना राजकीय हस्तक्षेपामुळे रमाई/शबरी घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठेवत आहेत. स्थानिक मतांचे गणित जुळवण्यासाठी साबळे अश्या पद्धतीने दबाव बनवत बेलवंडीतील राजकारण्यांना मदत करीत असुन, सामन्यांना छळन्याचे कामं करीत आहेत. गटविकास अधिकारी जगताप यांनी या प्रकरणी लक्ष घालून, योग्य सूचना कराव्यात अन्यथा, श्रीगोंदा पंचायत समितीच्या कार्यालयासमोरं हक्काचा संपुर्ण निधी प्राप्त होईपर्यंत फुले, शाहु, आंबेडकरी विचारांच्या पुरोगामी संघटनांच्या माध्यमांतून आंदोलन करणार असल्याचे संतोष शिंदे यांनी माध्यमांना सांगितले आहे.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply