फर्जी पोलिसाची लोकांच्या मर्जी विरोधात खिसे तपासणी. पारगावात दोघांना गंडवले..!

दिनांक १ सप्टेंबर, श्रीगोंदा:

तालुक्यातील घारगाव येथील रहिवासी असलेल्या एका शेतकऱ्याला वडाळीतील शेतीमध्ये जाऊन रोज काम करावे लागते. या दैनंदिन कामासाठी दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता ते घारगाव येथून पारगाव फाटा मार्गे वडाळी गावाकडे जात असतांना पारगाव फाटा ते पारगाव शिवारातील मारुती मंदिराच्या आसपास एका मोटर सायकल स्वारानेने त्यांचा पाठलाग केला.

मंदिराजवळ आल्यानंतर त्यांना आवाज देऊन थांबवले. किती वेळ झाला मी तुम्हाला आवाज देतोय.? तुम्ही थांबत नाहीत.! मी पोलीस आहे. हे बघा माझे कार्ड. मोठ्या साहेबांचा पत्नीचे दागिने चोरी गेलेले आहेत आणि आम्ही लोकांची तपासणी करत आहोत. तुमची तपासणी करावी लागेल. म्हणत, त्या इसमाने आबासाहेब खोमणे यांच्यासह आणखी एका इसमाला थांबून त्यांची झडती घेतली. थांबलेल्या त्या दुसऱ्यास इसमालाही तसेच सांगून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन खिशात काढून ठेवण्यास सांगितले. चैन काढल्यानंतर त्या पोलीसाने स्वतःच्या खिशातील रुमाल देत, त्यात चैन ठेवण्यास सांगितली.

त्याच पद्धतीने खोमणे यांनाही रुमाल देत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ठेवण्यास सांगितली. यानंतर खिसे तपासून तो पोलिस तिथून निघून गेला. खोमणेही त्यांच्या नियोजित कामासाठी निघून गेले. मात्र, शेतात पोहचल्यावर खिश्यात ठेवलेली चैन पाहिली असता, रुमालात चैन नव्हती.!

यानंतर घडलेला प्रकार खोमनेंच्या लक्षात आल्याने, त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. आबासाहेब खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भादवि कलम ४२० व १७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा शहरामध्ये अशा पद्धतीने सामान्यांना गंडा घालण्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील बायपास रोडवर एका इसमास मी पोलीस आहे. शहरात चोरी झाली आहे. अशी खोटी माहिती देऊन, तुमच्या हातातील अंगठ्या खीशात ठेवा. म्हणत, स्वतःकडील रुमाल देऊन, त्या इसमालाही फसवण्यात आले होते.

त्याचबरोबर भैरवनाथ चौकात एका खाजगी दवाखान्यात आलेल्या महिलेला अशीच माहिती सांगत, गळ्यातील दागिने पिशवीत ठेवा म्हणत, रुमाल दिला. अनं त्या महिलेच्या दागिन्यांवर अज्ञात इसमाने गंडा घातल्याचा प्रकार जुना नाही.

यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिकांनी अशा पद्धतीने पोलीस असल्याची माहिती देऊन, दागिने खिशात किंवा पिशवीत ठेवण्यासाठी स्वतःकडील रुमाल किंवा थैली देऊ करणाऱ्या डुबलीकेट पोलिसांपासून सावध राहावे. शंका आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा. Fake police checks against the will of the people. Both were ruined in Pargaon ..!

श्रीगोंदा पोलीस स्टेशन फोन क्रमांक – ०२४८७/२२२३३३ व बेलवंडी पोलीस स्टेशन फोन क्रमांक – ०२४८७/२५०२३३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

स्त्रोत: (आबासाहेब खोमणे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिनांक २८ ऑगस्ट २१ रोजी दिलेली फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading