मी अल्पसंख्यांक असल्याने मला सर्वांत जास्त टीका व आरोपांना सामोरे जावे लागते: बाळासाहेब नाहटा..

दिनांक १ सप्टेंबर, श्रीगोंदा:

तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करत असतांना राजकीय प्रक्रियेत कार्यरत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी राजकारणाचा गैरवापर करून, माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करू नये, मी समाजकारण करणारा कार्यकर्ता असून, कोरोना साथ प्रादुर्भाव, पाटपाणी पाणी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत सक्रिय कामं करणारा पदाधिकारी आहे.

मात्र, तालुक्यात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांपेक्षा माझ्यावर जास्त टीका होत असल्याची खंत बाळासाहेब नाहटा यांनी यावेळी व्यक्त केली. कृषी उत्पन्न बाजार समितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.

बाळासाहेब नाहटा यांनी मी अल्पसंख्याक असल्यामुळे माझ्यावर आरोप, प्रत्यारोप करून, नीच पातळीवर टीका करण्याचं धाडस येथील यंत्रणा व राजकीय पदाधिकारी करतात हे दुर्भाग्य असल्याचे नमूद केले.

कोरोना प्रादुर्भाव वाढत असतांना अनेक पीडितांना कोविड केअर सेंटरच्या माध्यमांतून मदत केली. सर्व सामान्य माणसांनी आशीर्वाद दिले. कित्तेकांना या आपत्तीतुन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातही काहींनी टीका टिप्पणी करण्यास मागेपुढे पाहिले नाही.

कसलेही गंभीर गुन्हे नसतांना मला तडीपार करण्याचा प्रस्ताव स्थानिक प्रशासन करीत आहे. माझ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वत्रिक शांतता भंग होईल असे कसलेच कृत्य मी केलेले नसतांना, माझ्या विरोधात प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. स्थानिक पोलीस माझ्या विरोधात पुरावे गोळा करत आहेत. मी सत्कार्य करत असतांना कितीही अडचणी आल्या.? तरी सामान्यांसाठी झगडत राहणार. असे त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला तसेच, गुन्हे शाखेला तालुक्यात चालू असलेली अवैध धंदे दिसत नाहीत. मात्र, सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते दिसतात हे चुकीचे आहे.

तालुक्यातील विविध प्रश्नांवर बोलण्याचा प्रयत्न केला. तर, राजकारणी कायदेशीर प्रक्रिया मागे लावत माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचे राजकारण तालुक्यात चालू असल्याचेही त्यांनी विशेष नमूद केले.

बाळासाहेब नाहटा यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आख्तरभाई शेख, टिळक भोस, बाप्पू सिदनकर, जहीर जकाते सह पदाधिकारी उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील एका तथाकथित नेत्याने आय.ओ.सी. कंपनीकडे पन्नास लाखांची खंडणी मागितल्याबाबत बाळासाहेब नाहटा यांनी खुलासा करण्याचे आव्हान केले होते. मात्र, याबाबत त्यांनी कोणतेही नाव जाहीर केले नसून, त्या व्यक्तीची पुराव्यासह तक्रार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

स्रोत:(पत्रकार परिषद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading