दिनांक ३ सप्टेंबर, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील प्रभाग ६ कार्यक्षेत्रातील गवळी गल्ली मधील रस्त्याच्या प्रश्नाबाबत संतप्त नागरिकांनी आज थेट मुख्याधिकारी देवरे यांचे दालन गाठले.

श्रीगोंदा शहरात व शहराबाहेरही अनेक रस्त्यांची कामे बहुतांश पूर्ण झाली आहेत. परंतु, शहरातील प्रभाग क्र.६ मधील मध्यवर्ती असलेल्या गवळी गल्ली मधील रस्त्याची पावसात दुरवस्था झाली असून, या रस्त्याबाबत पालिका पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊनही निधी अभावी काम रखडले असल्याचे पदाधिकारी व अधिकारी सांगत आहेत.

या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर नसतांना नमूद ठेकेदाराने हा रस्ता खोदल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तर, ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे रहिवाशांनी निवेदनात म्हटले आहे. मेनरोड ते सावरकर चौकाला जोडणारा या रस्त्यावर शहरातील प्रसिद्ध रेणुकामाता मंदिर आहे. तसेच, ससाणे नगर व सिद्धार्थ नगर येथील मागासवर्गीय लाभार्थ्यांचे रेशन दुकानही या रस्त्यात आहे.

सातत्याने होणारी वाहनांची वर्दळ व सामान्यांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी पालिका प्रशासनाने तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, रस्त्याचे काम मार्गी लावावे. अन्यथा, दिनांक १३ सप्टेंबर २०२१ रोजी स्थानिक रहिवासी व रस्त्यापासून वंचित असलेल्या पीडितांच्या माध्यमांतून उपोषण व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी (मुख्याधिकारी) मंगेश देवरे, (नगराध्यक्षा) शुभांगी पोटे, (उपनगराध्यक्षा) मनीषा लांडे यांना दिलेल्या निवेदनात दिलेला आहे.

यावेळी (माजी उपनगराध्यक्ष) व प्रभाग ६ चे (नगरसेवक) अशोक खेंडके हेही उपस्थित होते. निवेदन देताना प्रभाग ६ मधील रहिवाशी श्री. संन्देश गांधी, बापू अवसरे, हरिभाऊ काळे, चंद्रकांत भुते, बाबुराव हिरणावळे, संतोष बोरा, हिरामण हिरणावळे, प्रकाश भुते, दीपक हिरणावळे, माणिक विश्वकर्मा, अशोक महांमुनी, अजित पंडित, चांदेकर काका, माणिक हिरणावळे, सुहास तरटे, श्रीपाद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, अमोल हिरणावळे महेश खोत, adv.विनायक भुते, ऋषिकेश भुते, शुभम हिरणावळे यांचे सह महेश पवार उपस्थित होते.
स्रोत:(निवेदन)
