तर.? तुम्हाला जिवंत सोडणार नाही..! श्रीगोंदयातील घटना..!

दिनांक २२ जानेवारी, श्रीगोंदा:

रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेण्याच्या कारणातून जातीवाचक शिवीगाळ करत ऊसाने, काठीने तसेच, खोऱ्याच्या तुंब्याने तिघाजणांना मारहाण केल्याची घटना दिनांक २१ जानेवारी २२ रोजी ४:०० वाजण्याच्या सुमारास लोणीव्यंकनाथ – येळपणे रस्त्यावर काकडे वस्तीजवळ घडली आहे.

नितीन आप्पा काळे(वय २२ वर्षे), सदा अब्दुल काळे, (वय ३० वर्षे), शंकर बाळासाहेब दांगडे (वय ३० वर्षे) सर्व रा. देऊळगांव गलांडे, ता. श्रीगोंदा हे तिघे या मारहाणीत जखमी झाले आहेत.

या मारहाण प्रकरणी नितीन काळे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल जयसिंग वीर याच्यासह महेंद्र हिरामण थोरात, गणेश संपत पवार, संजय दगडु पवार, उमेश पोपट खराडे, आप्पा जंबे (पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. पिसोरे (येळपणे), ता. श्रीगोंदा या सहा जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्यासह मारहाण केल्याप्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, घटनेच्या दिवशी एका विना क्रमांकाच्या टाटा हेक्स गाडीतून आलेल्या वरील आरोपींनी येऊन, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मला घ्यायचे होते. तुम्ही कश्याला घेतले.? असे म्हणून, जखमी झालेल्या वरील तिघांना उसाने, काठी व खोऱ्याच्या तुंब्याने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तुम्ही परत येथे कामाला आले..! तर.? तुम्हाला जिवंत सोडणार नाही. ! अशी धमकी देत उसाने मारहाण करत येळपणे पर्यत पायी नेले.

या प्रकरणाचा पुढील तपास कर्जत पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव हे करत आहेत.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading