दिनांक २२ जानेवारी, श्रीगोंदा:
तालुक्यात सामाजिक चळवळीबरोबरीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सक्रिय काम करणारे कार्यकर्ते व आरपीआयचे (जिल्हा उपाध्यक्ष) अविनाश आकाश घोडके यांनी संघटनेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी संघटना सोडण्याचे कारण वैयक्तिक अडचण असल्याचे सांगितले आहे. यांच्यासोबत इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत संघटनेला जय-भीम केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, अहमदनगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना राजीनामा सुपूर्त करत, अविनाश आकाश घोडके (जिल्हा उपाध्यक्ष, अहमदनगर), रमण सोनवणे (कार्याध्यक्ष, श्रीगोंदा तालुका), अनिल जाधव (शहर उपाध्यक्ष, श्रीगोंदा) व पप्पू नदाफ (शहर सल्लागार, श्रीगोंदा) हे संघटनेतून बाहेर पडले आहेत.

नमूद पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हा व तालुका कार्यकारणीवर सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होतो. संघटनेने मुख्य प्रवाहात आणत, सामाजिक बांधिलकीच्या हेतूने काम करण्याची जिम्मेदारी दिली होती. त्याबाबत आम्हाला लेखी निवृत्ती पत्रही दिले होते. आपल्या संघटनेमध्ये काम करत असताना अनेक चांगले अनुभव आले. त्यामुळे कुशल कार्यकर्ता बनण्यासाठी प्रेरणा मिळाली.
आपल्या संघटनेचे धोरण चांगले आणि समाजाला आंबेडकरी व पुरोगामी विचारांच्या प्रवाहात पुढे नेणारे आहे. परंतु, आमच्या वैयक्तिक अडचणींमुळे आम्ही संघटनेमध्ये कार्यरत राहू शकत नाहीत. यामुळे संघटनेचा राजीनामा देत आहोत. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांना माध्यमांनी पुढील संघटना किंवा पक्ष प्रवेशाबाबत माहिती विचारली असता, त्यांनी एखादी सक्रिय व सर्वांना एका कक्षेत धरून, सामाजिक भूमिका व्यक्त करणारी धाडसी संघटना मिळाली.? तर, विचार करू. असे सांगितले आहे.
स्रोत:(राजीनामा)
